Ignite Maharashtra 2026 : एकदिवसीय कार्यशाळा

shivrajya patra

सोलापूर : राज्य व केंद्र शासनाच्या एमएसएमई संदर्भातील विविध योजना, उपक्रम व धोरणांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘Ignite Maharashtra 2026’ ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 

ही कार्यशाळा मंगळवारी, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 4.00 या वेळेत दि इंडस्ट्रियल को-ऑप. इस्टेट सोसायटी लि., होटगी रोड, सोलापूर येथे पार पडणार आहे. 

या कार्यशाळेस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  तथा ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे (महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यामध्ये Apparel Export Promotion Council (AEPC), Small Industries Development Bank of India (SIDBI), IDBI Capital Markets & Securities Ltd., The New India Assurance Company Limited तसेच India Post यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 

नवउद्योजक, निर्यातदार उद्योजक, स्टार्टअप्स तसेच शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून विविध शासकीय योजनांची माहिती घ्यावी, असं आवाहन जिल्हा उद्योग केंद्र, महाव्यवस्थापक, सोलापूर यांनी केलं आहे. 

To Top