सोलापूर : अल्पवयीन बालिकेस अमिष दाखवून अपहरण नेल्याच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी सच्चुकुमार कृष्णा चंद्रबन्सी याला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातून रविवारी ताब्यात घेतले. पोलीस गुन्ह्यातील आरोपी आणि अल्पवयीन बालिकेचा 06 महिन्यापासून शोध घेत होते, मात्र ते मिळून न आल्याने तो गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडं वर्ग करण्यात आला होता. या कक्षाकडील अधिकारी आणि अंमलदारांनी अवघ्या 18 दिवसात उभयतांना ताब्यात घेतलंय.
अल्पवयीन बालिकेच्या अपहरण प्रकरणी गतवर्षी 25 सप्टेंबर रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात BNS सन 2023 चे कलम 137 (2), 143 प्रमाणे गुन्हा दाखल होता. पोलीस ठाण्याकडील तत्कालीन तपासीक अंमलदार यांनी प्रयत्न करुन देखील आरोपी व पिडीत बालिका यांचा शोध घेऊनही ते मिळून आले नव्हते. 
त्यामुळे तो गुन्हा अधिक तपासासाठी पुढील तपासासाठी 03 फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपासकामी गुन्हा वर्ग झाला होता.
कक्षाकडील तपासीक अधिकारी व त्याचे पथकातील पोलीस अंमलदारांनी कौशल्यपूर्वक तपास करून व तांत्रिक माहिती प्राप्त करुन घेऊन आरोपी सच्चुकुमार कृष्णा चंद्रबन्सी व अपह्यत मुलीस, 21 फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हा, चाकण परिसरातील बिरवडी आंबेठाण रोड येथून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरीता दुसऱ्या दिवशी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे हजर केले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) श्रीमती डॉ. अश्विनी पाटील व सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरिक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील मपोसई/अश्विनी काळे, मसफौ. अलका शहापुरे, पोह/846 महादेव बंडगर, पोना/770 अ. सत्तार पटेल, चालक पोशि/724 दादा गोरे तसेच सायबर पोलीस ठाणे कडील पोह/601 गायकवाड आणि पोह/208 मच्छिद्र राठोड यांनी पार पाडली.
