रणजितसिंह मोहिते-पाटील बालक मंदिर आणि आशा मराठी विद्यालयात साजरा बाल शिवरायांचा पाळणा

shivrajya patra

सोलापूर : येथील निलम नगर परिसरातील रणजितसिंह मोहिते-पाटील बालक मंदिर आणि आशा मराठी विद्यालयात शिवजन्मोत्सवानिमित्त बाल शिवबांचा पाळणा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ, भोसले कुटुंब आणि महिलांचा पारंपरिक वेशभूषेत जिवंत देखावा सादर करण्यात आला. 

या कार्यक्रमास मुख्याध्यापिका तस्लिमबानो पठाण, आफरीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. शोभा मुळे, सौ. धानेश्वरी स्वामी, सौ. मोहिनी भावे, कु. मंजेली जकापुरे, कु. अपर्णा भंडारी यांनी परिश्रम घेतले.

To Top