शिवालय शिवजन्मोत्सव अध्यक्षपदी उमेश पोरे

shivrajya patra

सोलापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवालय शिवजन्मोत्सव मंडळाच्या वार्षिक नियोजन बैठकीत उत्सव समिती नुतन  पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी उमेश पोरे तर चिटणीसपदी रमाकांत ताटे यांच्यासह नुतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.

शिवालय सामाजिक बहुद्देशीय संघटनेची सरत्या वर्षाचा आढावा आणि आगामी वर्षाची शिवजन्मोसत्व नियोजन बैठक येथील रुपाभवानी मंदिर बागेत मंगळवारी खेळीमेळीत  पार पडली. 

यात मावळते अध्यक्ष हरिष सिध्दे यांनी वर्षभर रक्तदान शिबिर, सिना नदी पूरग्रस्तांना मदत अशा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. शिवालयचे संस्थापक प्रकाश शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी उत्सव समिती पदाधिकारी निवड करण्यात आले. 

कार्याध्यक्ष- अर्थव भोसले, लखन जाधव, उपाध्यक्ष- राहुल मगृमखाने, साबीर शेख, संकेत पाटील, युवराज माने, खजिनदार- मोहन चटके, सहखजिनदार- शिवराज कलशेट्टी, मिरवणूक प्रमुख- दशरथ माने, सुमित वाघमारे आणि सचिन मग्रुमखाने, लेझीमप्रमुख- रोहन म्हमाणे, बालाजी कुरे, आकाश फुलसे, सिद्राम कट्टीमणी, प्रशांत बिराजदार आणि रोहित भोसले, पुजाप्रमुख- विनोद शिंदे, स्वप्निल कुलकर्णी यांचा नुतन पदाधिकाऱ्यांत समावेश आहे.

नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार नगरसेवक अमोल शिंदे, राजन जाधव, प्रमोद मोरे, नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, विनोद भोसले, ज्ञानेश्वर सपाटे, महादेव गवळी, प्रभाकर काशिद, सुखदेव शिंदे, राम गायकवाड, मोहन चटके, मावळते अध्यक्ष हरिष सिध्दे, अभिराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी राजू पुणेकर, निलेश शिंदे, गणेश शिंदे, सागर चव्हाण, महेश पवार, रवी अंधारे, शिवानंद सोलापुरे, सुरेश रुपनर, सिध्दार्थ भुतनाळे, किरण शिंदे, स्वराज्य चव्हाण, भीमराव जाधव, अभिजित बिडवे, अमोल कामाणे, विठ्ठल व्यवहारे, जीवन यादव, सुरज वाजपेयी, राजू हंडे, विरेश मठपती आदी उपस्थित होते.

To Top