संत सेवालाल महाराज जन्मोत्सवानिमित्त रविवारी भव्य मिरवणूक

shivrajya patra

सेवा फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वाखाली बैठक; महाप्रसादाचे आयोजन

सोलापूर : संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात रविवारी, 15 फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक व धार्मिक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त बंजारा समाजाची विस्तृत बैठक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी सहायक आयुक्त प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड, मिरवणुकीच्या तयारीवर आणि अन्य कार्यक्रमांच्या आयोजनावर चर्चा झाली.

बैठकीत उत्सव समितीची स्थापना करून विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यंदाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. 

उत्सवाच्या नियोजनासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सल्लागार तसेच विविध समित्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. शहरातील विविध भागांतून समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित असून मिरवणुकीला भव्य स्वरूप देण्याची तयारी सुरू आहे.

मिरवणुकीचा मार्ग व वेळापत्रक

रविवारी, दुपारी 02:00 वाजता संत सेवालाल चौक, इंचगिरी मठ, विजापूर रोड येथून मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. दुपारी 02:30 वाजता माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. 

त्यानंतर मिरवणूक दुपारी 03:00 वाजता विजापूर नाका येथे पोहोचेल. दुपारी 03:30 वाजता विजापूर नाका येथून संत सेवालाल चौक येथे आगमन होईल. सायंकाळी 04:30 वाजता प्रतापनगर तांडा येथे मिरवणूक दाखल होणार असून सायं. 05:30 वाजता गोरपिठ प्रताप नगर तांडा येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे.

धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद सायंकाळी 06:00 वाजता गोरपिठ येथे संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेसमोर भोग अर्पण करून सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे.

संत सेवालाल महाराजांनी समाजात एकता, सेवा, संस्कार आणि आध्यात्मिक मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणीचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाजात ऐक्य दृढ करण्यासाठी हा जन्मोत्सव साजरा केला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

या बैठकीत अध्यक्षपदी सुनिल राठोड, उपाध्यक्ष- सूरज पवार, शिवानंद  राठोड, राजू चव्हाण, कार्याध्यक्ष- संजय जाधव, सचिव- बंडू पवार सहसचिव- दत्ता राठोड, मिथुन राठोड, संपर्क प्रमुख- उमेश चव्हाण, गजानन चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख- आकाश चव्हाण तर भारत राठोड, राजू जाधव (महाराज), गोविंद पुढारी, मिरवणूक प्रमुख- प्रविण जाधव, अमित राठोड यांची सल्लागारपदी एकमतानं निवड करण्यात आलंय.

तमाम बंजारा समाज बांधवांनी तसेच सर्व नागरिकांनी रविवारी, 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन “संत सेवालाल महाराज की जय” असा जयघोष करावा, असे आवाहन उत्सव आयोजित समितीच्या वतीने करण्यात आलं आहे.

To Top