कंबर तलाव येथील खडा मस्तान बाबा यांचा उद्यापासून ऊरूस

shivrajya patra

सोलापूर : जनमाणसांत कंबर तलाव अशी ओळख असलेल्या तलावासमोरील सय्यद बुखारी दर्गाह आवारातील हजरत सय्यद अहमद शाह अलमारूफ खडा मस्तान बाबा यांच्या 44 व्या ऊरूसाला शुक्रवारी, 13 फेब्रुवारीपासून प्रारंभ आहे.

त्याप्रमाणे गुरुवारी, 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी परचम कुशाई झालीय, शुक्रवारी, 13 फेब्रुवारी रोजी रात्री 08.30 वा. नंतर मस्तान बाबा यांचा संदल काढण्यात येणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 06.30 वा. नंतर चिरागा-फातेहा खानीचे आयोजन करण्यात आलं आहे.

रविवारी, 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी असर च्या नमाज नंतर जिआरत केली जाणार असल्याची माहिती दर्गाचे सचिव हाजी हारुन हाजी इब्राहिम शेख यांनी दिलीय.तरी या धार्मिक कार्यक्रमांना जास्तीत जास्त भक्त भाविकांनी उपस्थित राहावं, असं आवाहन दर्गाह कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे.

To Top