लाक्षणिक उपोषणाने मनपाला जाग; ... अखेर बसवेश्वर पुतळा उभारणी कामाला प्रारंभ

shivrajya patra

सोलापूर : अखेर बहुप्रतिक्षित बसवेश्वर सर्कल (कोंतम चौक) येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा पुन्ह:श्च उभारणी कामाला सुरुवात झाली. प्रशासनाला जाग यावी, या आग्रही मागणीसाठी बसव प्रेमींनी शनिवारी, एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. महानगरपालिकेच्या नगर अभियंता यांनी उपोषण स्थळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सोमवारी, 02 फेब्रुवारी रोजी कामाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला. यामुळं शहर-जिल्ह्यातील बसव प्रेमींच्या आनंदाला जणू उधाण आलंय.

जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा परिसर सुशोभीकरणाचं काम गेली 03 वर्षे सुरू होते, त्याचाच भाग म्हणून महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारुढ पुतळा चबुतऱ्यावरुन हलविण्यात आला होता. प्रदीर्घ कालावधी लोटला तरी काम पूर्ण होत नव्हते. महापालिका प्रशासनाकडून या कामात दिरंगाई होत असल्याच्या भावनेने बसव प्रेमींच्या मनात रोष निर्माण झालेला होता. 

प्रशासनाला जाग यावी, या आग्रही मागणीसाठी शहर-जिल्ह्यातील बसव प्रेमींनी शनिवारी, 31 जानेवारी रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेऊन प्रशासन कामाला लागले. नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी उपोषण स्थळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सोमवारी, 02 फेब्रुवारी रोजी कामाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला.

केंद्रीय आयुष मंडळाचे सदस्य व शिव-बसव चरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे व महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मंडळ (जुळे सोलापूर) चे अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांच्या हस्ते पुतळा उभारणी कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी चंद्रकांत रमणशेट्टी, ऍड. राजशेखर बिराजदार-पाटील, वीरेंद्र हिंगमिरे, आनंद मुस्तारे, गणेश चिंचोळी, बाबासाहेब कुलकर्णी, शिवलिंगप्पा शाबादे, विश्वनाथ आमणे, दशरथ वडतीले, डॉ. बसवराज बगले, चन्नवीर चिट्टे, शशिकांत बिराजदार, सकलेश बाभुळगावकर, भीमाशंकर पदमगोंडा, दयानंद भोरे, वैभव विभुते, सिंधु काडादी, पुष्पा गुंगे, शशिकला रामपुरे, प्रार्थना बिज्जरगी, वर्षा विभुते, विद्या जोडभावी, स्मिता नाईक, माधुरी बिराजदार, रेश्मा निडगुंदी, साक्षी हौदे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजशेखर बुरकुले यांनी तर अमित रोडगे यांनी सर्व उपस्थितांचे  आभार मानले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसवराज लोहार, सुनील धरणे, विजयकुमार बिराजदार, सोमनाथ चौधरी, राहुल जत्ती, सिद्राम छपेकर, विशाल पाटील, राहुल कत्ते यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी : जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा उभारणी कामाच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. शिवरत्न शेटे, श्रीशैल हत्तुरे, नरेंद्र गंभीरे, सिंधु काडादी, पुष्पा गुंगे, अमित, रोडगे, राजशेखर बुरकुले, आनंद मुस्तारे, चन्नवीर चिट्टे, विजयकुमार बिराजदार छायाचित्रात दिसत आहेत.

To Top