मध्य रेल्वे मंडल प्रबंधक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर 12 फेब्रुवारीला उपोषण

shivrajya patra

सोलापूर : मध्य रेल्वेकडील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या फॅमिली पेन्शनच्यासंबंधी आलेल्या अर्जावर विनाविलंब चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना डी. आर. एम. यांनी पेन्शन अदालतीत सर्व वेल्फेअर इन्स्पेक्टर दिल्या होत्या. एका अर्जदाराकडं जवळपास 50 दिवसात चौकशीसाठी कोणीही फिरकलं नसल्याचं पुढं आलं आहे. त्यांच्या  सूचनेकडे वेल्फेअर इन्स्पेक्टर यांनी जणू कानाडोळा केल्याचं दिसतंय. पेन्शन अदालतीतील अर्जावरील चौकशीसाठी एक अर्जदार 12 फेब्रुवारी रोजीपासून डी.आर.एम. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपोषणास बसणार आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील मुस्लिम पाच्छा पेठेतील रहिवाशी कुमारी नसरीन बानो यांचे वडील वलियोद्दीन भागनगरी सोलापूर मध्य रेल्वेकडे सेवा केल्यानंतर वयोनियमाने 28 फेब्रुवारी 1993 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचं 29 सप्टेंबर 2018 तर आईचं 05 जुलै 2025 निधन झालं आहे.

उभयतांच्या निधनानंतर नसरीन बानो यांनी, मंडल रेल्वे प्रबंधक यांच्या कार्यालयाकडं 11 ऑगस्ट, 2025 रोजी अर्ज करून फॅमिली पेन्शन मिळण्यासाठी अर्ज केला. पेन्शन अदालतीसाठी हाच अर्ज 01 ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आला होता. 

मंडल रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडे 12 डिसेंबर रोजी पार पडलेल्या पेन्शन अदालतीत, डी.,आर.,एम. यांनी अदालतीत आलेल्या फॅमिली पेंशनची प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्व वेल्फेअर इन्स्पेक्टर यांना सर्वांची चौकशी करुन अहवाल सादर करावे व सर्वांचे काम लवकरात लवकर करण्याचे सूचित केले होते. 

जवळपास गेल्या 50 दिवसात वेल्फेअर इन्स्पेक्टर नसरीन बानोच्या अर्जावर चौकशीसाठी त्यांच्याकडं संपर्क साधला नसल्याचं सांगण्यात आलंय. हा प्रकार वरिष्ठांच्या चांगल्या सूचनेकडे कानाडोळा आहेच, त्याचबरोबर अर्जदाराला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवणारा आहे. या प्रकाराविरुद्ध आपण मध्य रेल्वे, मंडल रेल्वे प्रबंधक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपोषणास बसणार असल्याचं नसरीन बानो यांनी मंडल रेल्वे प्रबंधक यांच्या कार्यालयाला एका निवेदनाद्वारे कळविलं आहे.

To Top