सोलापूर : गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा व मारामारी करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घातक शस्त्र जवळ बाळगून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या मजहर जब्बार कोरबू (वय- 33 वर्षे) आणि गणेश राम जंगडेकर (वय- 42 वर्षे) याला सोलापूर पोलीस आयुक्तालय तसेच उर्वरित सोलापूर जिल्ह्यातून 02 वर्षांकरिता तडीपार करण्यात आलंय.

गणेश राम जंगडेकर (रा. मोदीखाना, सोलापूर) याच्याविरुध्द 2020, 2024 व 2025 या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा व मारामारी करणे, सामान्य नागरीकांना शिवीगाळ मारहाण करुन दमदाटी करणे, सामान्य नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत तर मजहर जब्बार कोरबू (115, कुर्बान हुसेन नगर, सोलापूर) याच्याविरुध्द 2014, 2016, 2017, 2020, 2021, 2024 आणि 2025 या कालावधीमध्ये गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आलंय.
उभयतांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्याकडून पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावांच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन उभयतांना सोलापूर शहर आणि उर्वरीत सोलापूर जिल्ह्यातून 02 वर्षाकरीता तडीपार केलं आहे.
