सोलापूर : अवैधरित्या अंमली पदार्थांची (गांजाची) विक्री, अवैधरित्या (गांजा विक्री करुन) मिळालेल्या पैशाच्या जोरावर टवाळखोर मुलांना सोबत घेऊन दहशत निर्माण करणे, चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या 30 वर्षीय नितीन सुभाष ढाले याला सोलापूर 02 जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय.
त्याच्याविरुध्द जेलरोड पोलीस ठाणेकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन नितीन सुभाष ढाले (रा. मुस्लिम पाच्छा पेठ, कमेला, बिफ मार्केट जवळ, सोलापूर) यास सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर आणि धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केलं आहे.२००९, २०१९, २०२०, २०२१, २०२३ व २०२५ या कालावधीमध्ये सामान्य नागरीकांना साथीदारांसह मारहाण करुन दमदाटी करणे, असेही आरोप असल्याचं सांगण्यात आलंय.

