दक्षिण सोलापूर : तालुक्यातील मौजे कासेगांव येथील श्री दत्त हॉटेलचे मालक स्व. रामलिंग बाबू राऊत यांचे द्वितीय चिरंजीव विजय रामलिंग राऊत यांचं उपचारादरम्यान बार्शी इथं शुक्रवारी पहाटेपूर्वी निधन झाले. त्यांना गुरुवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते मृत्यूसमयी 63 वर्षीय होते.
कासेगांव येथे शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा-सून, तीन विवाहित मुली-जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ते अशोक राऊत, राजा राऊत, स्व. दत्तात्रय राऊत आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा कासेगांव येथील कर्मचारी बालाजी राऊत यांचे बंधू होत.
****
