चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेस 'सावित्री-फातीमा उपक्रमशिल शाळा' पुरस्कार

shivrajya patra

सोलापूर : येथील फिरदोस महिला शिक्षण व समाज सेवा संस्था संचलित चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेस शिक्षक भारती संघटनेच्यावतीने 'सावित्री-फातीमा उपक्रमशिल शाळा' म्हणून संघटनेच्या राज्यअध्यक्ष अशोक बेलसुरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी कादर शेख तर शिक्षक भारती संघटने जिल्हा अध्यक्ष सुजितकुमार काटमोरे, उपाध्यक्ष रियाज अहमद अत्तार आदींची उपस्थिती होती. माजी शिक्षक आमदार कपिल पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

हा पुरस्कार शाळेचे संस्थापक बशीर बागवान व शिक्षकांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वीकारला. शाळेस पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. जे. बी. बागबान तसेच पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं आहे.

To Top