बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

shivrajya patra

सोलापूर : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने, महासंघातील कर्तृत्ववान महिलांचा बुके देऊन सन्मान करण्यात आला. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या हिरवळीवर आयोजित केलेल्या सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कविता कदम, प्रिया कदम, फरीदा बेलीफ, स्वप्नजा कसबे, महानंदा शिंदे, सुनीता माळी, निर्मला मौळे आदी महिलांचा सन्मान करण्यात आला. 

यावेळी महासंघाचे राज्यसरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष मुख्याध्यापक नितीन गायकवाड, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष दत्तात्रय शिंदे, अक्कलकोट तालुकाध्यक्ष गंगाधर शिवशरण, दाऊद आतार, भागवत देवकुळे, गुंडीराम साठे, भीमराव माने, संतोष गायकवाड, जयदीप गायकवाड, बसवेश्वर पाटील, एकोराम चौगुले, महिबूब तांबोळी, शुभम इंगळे, राजेंद्र सोरटे, विलास काटकर, संदीप निस्ताने, सिद्धेश्वर भुरले आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. 

याप्रसंगी उपस्थित महिलांनी सावित्रीमाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या अनमोल कार्याची माहिती सांगितली. या सभेचे प्रास्ताविक दत्तात्रय शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रवी देवकर यांनी केले तर विलास सोरटे यांनी आभार मानले.

To Top