मराठा सेवा संघाच्या कार्यालयात जयंतीदिनी राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन

shivrajya patra

सोलापूर : राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या 428 व्या जयंतीनिमित्त सोमवारी, 12 जानेवारी रोजी येथील मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यालयात राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी जिजाऊ वंदना म्हणण्यात आली. त्यानंतर अभिवादन करून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. 

यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री सदाशिव पवार, जिल्हा सचिव लक्ष्मण महाडिक, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, वधुवर कक्षाचे राम माने, राजू व्यवहारे, शिवधर्म परिषदेचे शिवाचार्य गोवर्धन गुंड, जिजाऊ ब्रिगेडच्या उज्वला साळुंखे, अभिंजली जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्ष प्रीती कदम, लता ढेरे या उपस्थित होत्या. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन चव्हाण, नितीन मोहिते, राजू व्यवहारे, प्रकाश डोंगरे, अंबादास सपकाळे, नरेश मोहिते, राजेंद्र भोसले इत्यादींनी परिश्रम घेतले.

To Top