जिल्हा परिषदेच्या वतीने गायक मोहंम्मद अयाज यांचा सन्मान
सोलापुर : राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या 428 व्या जयंतीनिमित्त, 12 जानेवारी आयोजित कार्यक्रमात महागायक विजेते तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे ब्रँड अॅम्बेसेडर मोहंम्मद अयाज यांचा सत्कार करण्यात आला. मोहम्मद अयाज यांनी आपल्या सुरेल आवाजात 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्य गीत गाऊन स्वराज्य निर्माण करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज व माँ जिजाऊ यांना अभिवादन केले. 
सोलापूर जिल्हा परिषद मराठा सेवा संघ यांच्या विद्यमाने सोमवारी आयोजित कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण सभागृहात उपस्थित असलेल्या माय माऊलीसाठी, 'तू कितनी अच्छी है, ओ माँ तू कितनी अच्छी है' हे गीत गाऊन समस्त माय-माऊलींना भारावून टाकले. यावेळेस मोहम्मद यांचा सोलापूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते मोहम्मद अयाज यांना मानपत्र, शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. 
यावेळेस विचारपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील , उप मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ , जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक राजशेखर जगताप, अमोल जाधव, मुख्य लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, 
शिक्षणाधिकारी कादर शेख, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे , कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, गटविकास अधिकारी मनोज राऊत, महाराष्ट्र मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस मोहम्मद अयाज यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचं आभार व्यक्त केले.
छायाचित्र : जिल्हा परिषद, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर, संचालक प्रकल्प सोलापूर जिल्हा ग्रामीणचे अधिकारी राजशेखर जगताप यांच्यासह अन्य अधिकारी आणि गायक मोहम्मद अयाज.
