सोलापूर : राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जयंती दिवस धनेश अचलारे (बोरामणी) यांनी आगळा-वेगळ्या पध्दतीने साजरा केला. भावी पिढीच्या हाती पुस्तक देण्याच्या निकोप दृष्टीकोनातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील माननीय श्री संभाजीराव जनार्दन वाडकर सार्वजनिक वाचनालयास धनेश अचलारे यांच्यातर्फे ग्रंथ भेट देण्यात आले.
संस्थेतर्फे पुरुषोत्तम वाडकर व हरी गरड यांच्या हस्ते धनेश अचलारे यांचा फेटा व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती महेश वाडकर यांनी दिली.
संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन धनेश आचलारे यांनी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र करिताही मदत करणार असल्याचे जाहीर केले. 
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव, माजी सैनिक बालाजी ढेकळे, अमोल पाटील, सुरज परीट, विक्रम मिटकरी, अजित जाधव, प्रदीप माने, रमेश काटकर, श्रीशैल पांगरकर, अर्जुन हुडकर, लक्ष्मण कुंभार, नितीन स्वामी, उस्मान शेख, चंद्रकांत गायकवाड यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
