उत्तर सोलापूर : उपमुख्यमंत्री अजितदादांचे कुमठ्याशी स्नेह संबंध होते. या गावातील अगदी ब्रम्हदेवदादा यांच्यापासून ते दिलीपराव माने यांच्यापर्यंत अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. सहा-सात महिन्यापूर्वीच दादा कुमठे गांवी येऊन गेले होते. दादांचा स्नेह हा या गावातील अनेकांशी होता. आज दादा गेल्याचे दु:ख सहन न होणारे आहे, असं भावनिक मत नगरसेवक जयकुमार माने यांनी व्यक्त केले. त्यांनी दादांना श्रद्धांजली अर्पण करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
बुधवारी राज्याच्या राजकीय पटलावर दुर्दैवी घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातील युवकांचं कणखर नेतृत्व अजितदादा पवार यांचं बारामती इथं विमान अपघातात निधन झाले. त्यांना श्रध्दांजली अर्पित करताना नगरसेवक माने बोलत होते.
याप्रसंगी गावातील जेष्ठ मंडळी नागनाथ माने, गुरुसिद्ध कस्तुरे, चंद्रकांत लिंबीतोटे, तसेच तानाजी शिनगारे, हजरत शेख,हसन शेख,चंद्रकांत फुलमाळी, उमेश बरबडे, विठ्ठल म्हेत्रे, राजु मायनाळे, युवराज चव्हाण, विश्वनाथ भोपळे, देविदास राठोड, बाबु जाधव, राम माने, सातप्पा भद्रशेट्टी, रमेश नायकुडे, संजय गरड, महादेव कोळी, जिलाणी शेख आणि नजीर शेख यांच्या कुमठे ग्रामस्थांनी साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली.
