जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी दृष्टीहीन दिव्यांगाचं उपोषण सुरू

shivrajya patra


 सोलापूर : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीने केलेल्या सूचनांची अंमलबजावणीसाठी गेले वर्षभरापासून पाठपुरावा करीत असलेल्या दृष्टीहीन दिव्यांगास शासन दरबारी पदो-पदी ठेचा खाव्या लागत असल्याचं त्याच्या उपोषणानं पुढं आलंय. माळशिरस तालुक्यातील मेडद येथील महेश धर्मराज साळवे असं उपोषणकर्त्याचं नांव असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील उपोषणाचा मंगळवारी तिसरा दिवस होता.

मेडद गावचा दृष्टीहीन दिव्यांग महेश धर्मराज साळवे याच्यासंबंधी अ. ज.जा. प्र. का.3 (1) (F) तरतुदीची अंमलबजावणी न करता समोरील व्यक्तीशी आर्थिक तडजोड करून पदाचा गैरवापर करीत कर्तव्यात कसूर केलेल्या अकलूज उपविभागीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची साळवे यांची मागणी आहे.


यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर न झाल्याची  खंत उपोषणकर्त्या महेश साळवेंची आहे. त्यांनी वेळोवेळी उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्या विरोध तक्रारी केल्या आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांना अंमलजावणीबाबत सुनावणी घेण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी महेश साळवेंची भूमिका आहे. 

1) आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या व आणि 3(1) (F) नुसार अंमलबजावी करावी, 2)पदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या व मी अंध असल्याचे माहित असूनसुद्धा मला अपमानित करून हुसकून लावणाऱ्या उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज यांच्यावर कडक कारवाई करावी, 3) अक्ट्रॉसिटी 17/18 केस मधील घर जागा सोडून दुसरी कडे राहत असून त्या घराचा आज पर्यत पंचनामा झाला नाही त्या जागेचा पंचनामा करून तेथील महत्वाची कागदपत्रे कपडे, भांडी, व इतर महत्वाच्या वस्तू ताब्यात मिळाव्यात, 4) मला माझ्या रमाई घरकुल योजननाच्या हक्कापासून लाभास पात्र असताना वंचित ठेवणाऱ्या माळशिरस पंचायत समिती मधील ननवरे कडून माझं घरकुल मंजूर करण्यात यावे आणि मौजे पिराळे वडिलपार्जित महार वतन 7/12 बेकायदेशीर नोंदी रद्द न करणाऱ्या गेले तीन वर्षापासून वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा कर्तव्यात कसूर करणाऱ्या उपजिल्हाधिरी (कुळ कायदा शाखा) यांच्यावर कडक कारवाई करावी, बेकादेशीर नोंदी रद्द करून आमची नावे 7/12 नोंदी लावण्याचे आदेश द्यावेत. (सोबत माळशिरस तहसील अहवाल) अशा मागण्या असल्याचे दृष्टीहीन दिव्यांग महेश साळवे यांनी सांगितलं आहे.

To Top