प्रजासत्ताकदिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'शाक्य' सह विविध संघटनांची मानवंदना

shivrajya patra

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क) येथील पुतळ्यास प्रथमच शाक्य सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी, सामाजिक बहु. संस्था, सोलापूर, यशसिध्दी आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन, सोलापूर युनिट, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना सोलापूर, बहुजन हक्क सामाजिक संघटना-महाराष्ट्र राज्य, महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सोलापूर,आयु. औदुंबर मस्के, आयु. अंगद मुके, आयु. अशोक आगावणे यांनी पुष्पहार अर्पण केला. वरील संस्थांनी संयुक्तीकरित्या मानवंदना दिली. तसेच राष्ट्रध्वजास जन-गण म्हणून राष्ट्रगीत गायले.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात नियोजित शाक्य संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विशेष ड्रेसकोड मध्ये पुष्पहार अर्पण करुन मानवंदना देण्यात आली.

सदर प्रसंगी आयु. डॉ. औदुंबर मस्के (सर्जन), यांनी प्रजासत्ताकदिनाबद्दल सखोल अशी माहिती सांगितली. आयु. अशोककुमार दिलपाक, (नियोजित शाक्य संघ संघटक मराष्ट्र राज्य) यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल भारतीयांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी बाबासाहेबांनी जे संविधान दिले आहे. त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशाचा कारभार चालतो. या संविधानात सर्वांना मुलभूत अधिकार बहाल केलेले आहेत. तसेच स्त्रियांना पुरुषांबरोबर समानतेचा अधिकार तसेच शैक्षणिक अधिकारही दिलेले आहेत. संविधानात प्राणीमात्रांना, पशू-पक्ष्यांच्या बाबतीत सुध्दा कायदे केलेले आहेत. 

प्रजासत्ताक दिनी, 26 जानेवारी रोजी सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था वगैरे या ठिकाणी जाऊन ध्वजारोहण करुन ध्वजास मानवंदना दिली जाते. परंतू ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले आहे, त्यांना या दिवशी पुष्पहार घालण्याकरिता फारच कमी लोक जातात. प्रजासत्ताक दिनाला बाबासाहेबांना दूर ठेवले जाते, असे सर्वांना वाटत आहे, या समजाला फाटा देण्यासाठी प्रजासत्ताक दिनी एकत्र आलेल्या संघटनांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करुन विशेष ड्रेसकोड मध्ये बिगुल वाजवून मानवंदना दिलेली आहे. असे सांगितले.

आयु. शिवपुत्र घटकांबळे (उपाध्यक्ष- यशसिध्दी आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य) यांनी संविधानाबाबत विस्तृतपणे माहिती सांगितली. आयु. अशोक आगावणे (सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी) यांनीही संविधानाविषयी माहिती सांगितली. 

यावेळी भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय लोकशाहीचा विजय असो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शाहु महाराजांचा विजय असो, महात्मा ज्योतीबा फुले यांचा विजय असो, माता सावित्रीबाई फुले यांचा विजय असो, माता रमाईचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

याप्रसंगी प्रमोद रोहिदास वाघमारे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन) यांना या वर्षीचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याने त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन या कार्यक्रमात सहकुटुंब सत्कार करण्यात आला.

यावेळी नागेश गायकवाड, मिलिंद कोरे, कैलास गायकवाड, गोपी कांबळे, व्यंकटेश सोनवणे, अंबादास बनसोडे, आंनद काळोखे, चंद्रकांत कांबळे, अशोक सोनवणे, राजकुमार ओहोळ, श्रीमंत गायकवाड, नाना गाडे, ईश्वर मसलखांब, शशिकांत बाबरे, व्यंकटेश सोनवणे, गौतम चंदनशिवे, यलदास वामणे, किसन सुरवसे, सुधाकर सुरवसे आणि शांताराम वाघमारे (सर्व शाक्य सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संघटना, सोलापूर.), कमलाकर कांबळे, विद्याधर ढोणे, सुरेश कळसोडे, निंबाजी कांबळे, कुंदन कांबळे, गुंडू केंगार, मधुकर माने, चंद्रकांत बनसोडे, विलास जाधव, अशोक कांबळे, सुभेदार बनसोडे, सुर्यकांत आगावणे, नागनाथ शिंदे, सुर्यकांत गजघाटे, मल्लिकार्जुन धसाडे, बाबुराव थंब, भारत कांबळे, माणिक धसाडे (सर्व यशसिध्दी आजी माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन सोलापूर युनिट), शंकुतला गायकवाड (नियोजित शाक्य संघ माता रमाई, महिला बिग्रेड महाराष्ट्र राज्य), दयानंद बनसोडे, (अध्यक्ष-बहुजन हक्क अभियान सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य), प्रकाश वाघमारे, मुज्जफर बागवान, बापू मस्के (बामसेफ), दयानंद भालशंकर, अॅड. विश्वास जाधव, (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी मंच, सोलापूर) सुधाकर शिंदे, प्रसेनजित दुपारगुडे, अशोक सोनवणे (सेवानिवृत्त डीवायएसपी), विश्वास गायकवाड, तात्या माळशिखरे, यांची उपस्थिती होती.

To Top