जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कामाला लागा : प्रा. लक्ष्मणराव ढोबळे

shivrajya patra

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची तालुका आढावा बैठक 

सोलापूर/प्रशांत गायकवाड : आगामी  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असं आवाहन माजी मंत्री  प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रा. ढोबळे बोलत होते.

यावेळी दक्षिण सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढविण्याच्या संदर्भात आढावा बैठक शुक्रवारी हॉटेल सोना हॉल येथे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली व निरीक्षक अरुण तोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या बैठकीला दक्षिण तालुक्याचे अध्यक्ष दत्ता घोडके, उत्तर तालुक्याचे ओबीसी आघाडीचे दत्तात्रय निंबाळकर, बाळासाहेब पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती. जि. प. पंचायत समिती निवडणूक सर्व ताकदीनिशी लढण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचं आश्वासन प्रा. ढोबळे यांनी यावेळी दिले. 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील नूतन पदाधिकारी यांचा सत्कार नियुक्ती पत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन प्रा. ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आला. मनोगत व्यक्त करत असताना तालुक्याचा भौगोलिक, सामाजिक, राजकीय अभ्यास करुन सर्व समाज घटकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून या सर्व निवडी वरिष्ठांच्या आदेशाने करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. सर्व नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा देताना प्रा. ढोबळे यांनी त्यांच्या उज्वल कारकिर्दीस कामना केली. 

या बैठकीला तालुका अध्यक्ष दत्ता घोडके, नूतन कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड, प्रकाश पटणे, बळीराम हेबळे, मिलिंद मुळे, उमाकांत रावत, गणेश मोरे, सिध्दाराम कुंभार, अजिम शेख, पैगंबर मोमीन, अप्पाशा संगमेश बगले, निगोंडा तळ्ळे, माने, खाजाप्पा शिवशरण आदि पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळ :

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दक्षिण सोलापूर तालुका कार्यकारणीच्या बैठकीत  मार्गदर्शन करताना प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, निरीक्षक अरुण तोडकर,मिलिंद मुळे, संगमेश बगले-पाटील, प्रशांत गायकवाड, बळीराम हेबळे,तालुकाध्यक्ष दत्तात्रय घोडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

To Top