सोलापूर : नुकत्याच पार पडलेल्या 44 व्या कुमार राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू वाडीकुरोली (ता. पंढरपूर) येथील वसंतराव काळे प्रशालेची विद्यार्थिनी व कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबची खेळाडू स्नेहा अनिल लामकाने जानकी पुरस्काराची मानकरी ठरली. 
त्यानिमित्ताने स्नेहा आणि तिचे प्रशिक्षक अतुल जाधव यांचा सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष महेश गादेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 
यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष अजितकुमार संगवे, सचिव उमाकांत गायकवाड, सहसचिव मोहन रजपूत, तांत्रिक समिती सचिव शिवशंकर राठोड, कार्यकारणी सदस्य सुरेश खुर्द-भोसले, शरद व्हनकडे आणिजावेद मुलाणी आदी उपस्थित होते.
