सोलापूर : दुचाकीस्वारास रस्त्यात आडवून लाथा-बुक्याने मारहाण करीत उजव्या हाताचे मनगटाजवळ चावा घेऊन टोळीने त्याच्या जवळील 25 लाख रुपयांची रोकड आणि कागदपत्राची बॅग हिसकावून घेऊन पळून गेले. ही थरारक घटना मंगळवारी रात्री जुना कारंबा नाका परिसरात घडली होती. फौजदार चावडी पोलिस D. B. पथकानं हा गुन्हा उघडकीस आणला. त्यात 08 संशयित दरोडेखोरांना गजाआड केलं असून त्यांच्या ताब्यातून 02 लाखाची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेल्या 03 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, हल्ली जुना पुना नाका श्रीराम अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेले गजेंद्रसिंह बनुजी चावडा (वय-48 वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. मु. पो. डडीयाल ता. विसनगर, जि. मेसाना, राज्य गुजरात) हे मंगळवारी, 06 जानेवारी रोजी मार्केट यार्ड सोलापूर येऊन त्यांच्या घरी अॅक्टीवा मोटार सायकल वरुन जात असताना जुना कारंबा नाका सोलापूर येथील गतीरोधक जवळ १९.०० वा.चे सुमारास बर्गमॅन मोटार सायकल तसेच शाईन मोटार सायकल व युनिकॉर्न मोटार सायकल वरुन अनोळखी 08 इसमांनी चावडा यांचे मोटार सायकल जवळ येऊन त्यांना मारहाण करून त्यांच्या हातात चावा घेऊन त्यांच्या जवळील 25 लाख रुपयांची रोकड आणि कागदपत्रे असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली.
याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, दुय्यम पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहिती, अन्य पुरावे आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीनुसार कौशल्य पूर्ण तपास करून 08 संशयित आरोपींना लक्ष्मी मार्केट येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत 02 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली.
गुन्ह्यात वापरलेल्या 03 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील उर्वरीत रक्कम व मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई चालू आहे. यातील सर्व 08 आरोपीतांना अटक करण्यात आलीय. न्यायालयानं त्यांना 04 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिलीय. या आरोपीच्या मुसक्या आवळून दाखल गुन्हा उघड करून गुन्ह्यातील दरोडा घालून चोरी केलेली रोख रक्कम 2,00,000 व 03 मोटार सायकली असा एकूण 04,55,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-01) प्रताप पोमण, वपोनि महादेव राऊत, दुपोनि तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोह प्रविण चुंगे, पोहवा/जगदीश हुल्ले, पोहवा/बसवराज परीट, पोहवा/सचीन बाबर, पोहवा/आयाज बागलकोटे, पोना/शिवानंद भिमदे, पोकॉ/कृष्णा बडुरे, पोकॉ विनोदकुमार पुजारी, पोकॉ/विनोद व्हटकर, पोकॉ/अजय चव्हाण, पोकॉ/सुधाकर माने, पोकॉ/अतिश पाटील, पोकॉ/नितीन मोरे, पोकॉ/पंकज घाडगे, पोकॉ/अमोल खरटमल, पोकॉ/शशिकांत दराडे, पोकॉ/ज्ञानेश्वर गायकवाड, पोकॉ/दत्ता, कोळवले, पोकॉ/तौसीफ शेख आणि पोकॉ/सुरज सोनवलकर यांनी बजावली.
... हे आहेत आरोपी !
01) शाहिद अब्दुलगणी शेख, वय-27 वर्ष, रा.579, न्यु पाच्छा पेठ, अशोक चौक, सोलापूर),
02) सोहेल हनिफ शेख (वय-24 वर्ष, रा.घर नंबर 513, इंदिरा नगर, गेंट्याल चौक, सोलापूर),
03) उमर फारूक जलाल शेख (वय-25 वर्ष, रा.न्यु पाच्छा पेठ, सोलापूर),
04) मजहर युन्नुस बागलकोटे (वय-28 वर्ष, रा.घर नंबर 435, न्यू पाच्छापेठ, लालबहादूर हायस्कुल जवळ, सोलापूर),
05) समीर राजअहमद सय्यद (वय-26वर्ष, रा.घर नंबर 413, न्यु पाच्छा पेठ, सोलापूर),
06) मोईन शौकत शेख (वय-26 वर्ष, रा.घर नंबर 509, पाथरूट चौक, न्यु पाच्छापेठ, सोलापूर),
07) जमीर रफिक शेख (वय-23 वर्ष, रा.न्यु पाच्छापेठ, सोलापूर),
08) अल्लाबक्ष कादर सय्यद (वय-28 वर्ष, रा.न्यु पाच्छा पेठ, कैकाडी गल्ली मैदान, अशोक चौक, सोलापूर).
