हवेली : जगभरात सर्वत्र नववर्ष प्रारंभानिमित्त शुभेच्छांचं अदान-प्रदान होत असताना, 01 जानेवारी रोजी भिमा-कोरेगांव येथील शौर्याचं स्मरण करून विजयस्तंभासमोर नतमस्तक होण्यासाठी एकत्र आलेल्या बांधवांच्या साक्षीनं नियोजित शाक्य संघ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र राज्य यांनी विशेष ड्रेस कोडमध्ये वाद्य पथकासोबत पथसंचलन करुन शौर्य विजय स्तंभास मानवंदना दिली. 
शाक्य संघ महाराष्ट्र व यशसिध्दी आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य, शाक्य संघ सोलापूर, शाक्य संघ प्रज्ञासुर्य अमरावती, शाक्य संघ मिलिंद दौंड, नियोजित शाक्य संघ शौर्य विजयस्तंभ, पुणे, शाक्य संघ सुभेदार रामजी आंबेडकर, नांदेड, नियोजित शाक्य संघ सम्राट अशोका, बीड, नियोजित शाक्य संघ माता रमाई महिला ब्रिगेड महाराष्ट्र राज्य, नियोजित शाक्य संघ, बोधीसत्व, ठाणे येथील बौध्द उपासक व बौध्द उपासिका या मानवंदनेस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्यांच्या, शौर्य विजयस्तंभाचा विजय असो, 500 शूर महारांचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, राजर्षी छत्रपती शाहुजी महाराज यांचा विजय असो, अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 
नियोजित शाक्य संघ वाद्य पथक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र राज्य व फ्रेंडन्स म्युझिक अॅकॅडमी, संभाजी नगर यांनी वाद्य पथकासह सदर रॅली मध्ये सर्वात पुढे सहभागी होऊन पथसंचलन करुन विशेष ड्रेस कोडमध्ये शौर्य विजयस्तंभास वाद्य वाजवून सलामी दिली.
या कार्यक्रमात शाक्य संघ महाराष्ट्र यांनी विशेष ड्रेस कोड मध्ये प्रथमच सहभागी होऊन विजयस्तंभास लाखो बौध्द व बहुजन समाजातील जनसमुदायाच्या साक्षीनं मानवंदना दिली.
तत्पूर्वी, 31 डिसेंबर रोजी भिमा-कोरेगांव शौर्य दिन 01 जानेवारी रोजी शाक्य संघ महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र राज्य यांनी काढलेल्या "कोरेगांव भिमा शौर्यदिन 01 जानेवारी रोजी शाक्य संघ महाराष्ट्र या विशेषांकाचे प्रकाशन" त्रिशरण बुध्दविहार वढू खुर्द (ता. हवेली, जि. पुणे) येथे आयु. महेशगौरी (सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक व सह. पोलीस आयुक्त, पुणे) आयु. दिगंबर टोणपे (सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक, पुणे रेल्वे) व आयु. अंबादास शिंदे, (संस्थापक- दलित पँथर, महाराष्ट्र राज्य), राजीव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना शौर्य दिन आणि विजयस्तंभास अनुसरुन केले. 
याप्रसंगी आयु. महेशगौरी यांना समाज भुषण पुरस्कार, आयु. अशोककुमार दिलपाक (शाक्य संघ नेतृत्व पुरस्कार), आयु. राहुल आढाव यांना भूदान पुरस्कार व सर्वांना पंचशिल उपरणे व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना खालील पुरस्कार सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 
नागेश माटे, रमेश गायकवाड, अनिल तांदळे, अशोक गायकवाड, भगवान वाहुळे, मुरलीधर भुताळे, अक्षय भिवसणे, ऋषिकेश ढंगारे, अल्ताफ पठाण, सुनिल ब्रम्हणावर, परमेश्वर वाघ, शाहरुखखान पठाण, किशोर माटे, सौ. स्वप्नाली कोळगे, सौ. रमा साळवे, सौ. अनिता पवार, कु. पुनम राठोड, कु. अश्विनी सोनवणे, विजय कोळगे (सर्व रा. संभाजीनगर) यांनी वेगवेगळे वाद्य वाजवून शौर्य विजयस्तंभास मानवंदना दिली, त्यांना सन्मान पत्र देऊन व पंचशिल उपरणे घालून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक कार्याप्रित्यर्थ अंबादास शिंदे (संस्थापक अध्यक्ष दलित पँथर, महाराष्ट्र राज्य) यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
याप्रसंगी अरुण ओहळ (अध्यक्ष), सुरेश लोंढे, नारायण गायकवाड, कारभारी खंडीजोड, नरेंद्र निकाळजे, सुर्यकांत कांबळे, शशिकांत डाळींबे, अशोक काळे, राजु आडाव, राजु संसारे, राजु नाईकनवरे, सागरबाई ओहळ, आशा निकाळजे, सुनंदा लोंढे, कविता काळे, निता कांबळे, प्रमिला आढाव, हेमलता संसारे, मंदा कांबळे (सर्व शाक्य मिलिंद संघ दौंड), छाया गायकवाड, विजया दामोदर (ठाणे), रंजना रणपिसे, दुर्गा गवई, पुणे, बाबु पोळके (कॅप्टन), शिवपुत्र घटकांबळे, सुर्यकांत गजघाटे वगैरे यशसिध्दी आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य, उदय रंगारी, 
राजेंद्र मनवरे वगैरे (अमरावती), अशोक ठोकळ, कल्याण भंडारे, सुरेश साबळे वगैरे (बीड), अशोक धिवरे-वगैरे (नवी मुंबई), शिताराम काकडे, निलेश काकडे, सोनाबाई सखाराम काकडे (रा.काकडे वस्ती, वढू खुर्द, ता. हवेली), नागेश गायकवाड, मंगल गायकवाड, सुभाष सर्वोगोड (अध्यक्ष), गोविंद जगताप, महेंद्र बडेकर, माणिकराव भोसले, दिलपाक भिमा, दिगंबर कदम, भिमराव कांबळे, बाबासाहेब माने, संजय मागाडे, मिलिंद ठोसर, अशोककुमार शेलार, विष्णु गायकवाड वगैरे (पुणे), कुणाल दिलपाक (सोलापूर), गौतम भंडारे ( शाक्य संघ, सुभेदार रामजी आंबेडकर, नांदेड) वगैरे मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. 
सूत्रसंचालन डॉ. किर्तीपाल गायकवाड, सोलापूर यांनी केले तर अशोककुमार दिलपाक यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.
