शाहीन फाउंडेशन च्या “निकाह आसान करा” संकल्पनेतून 04 वर्षात 90 सामुहिक विवाह

shivrajya patra

सोलापूर : येथील शाहीन फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने “निकाह आसान करा” या संकल्पनेतून उपक्रमांतर्गत समाजातील गरजू कुटुंबातील युवक-युवतींचे विवाह त्या-त्या परिवारावर कोणताही आर्थिक ताण न देता पार पाडले जात आहेत. शाहीन फाऊंडेशनच्या इज्तेमाई (सामुहिक) विवाह सोहळा आयोजनाचं यंदाचं चौथे वर्ष होते. शाहीनच्या इज्तेमाई शादी (सामुहिक विवाह)  उपक्रमात आजवर  90 निकाह यशस्वीपणे पार पडले असल्याचे सांगण्यात आले.

शाहीन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एम. उमर शरीफ मर्चंट यांनी समाजातील वाढती हुंडा प्रथा, कर्ज काढून होणारी लग्नं, त्यावरील व्याज आणि त्यामुळे उद्ध्वस्त होणारे संसार पाहून “निकाह आसान करा” ही संकल्पना प्रत्यक्षात आणली.

या इज्तेमाई विवाह सोहळ्यात नवविवाहित दांपत्यांना संसारासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मोफत देण्यात आल्या. यामध्ये पलंग, गादी, कपाट, भांडी-कुंडी, स्वयंपाक साहित्य, चमचे, डबे, चादरी, सतरंजी, उशा, कपडे, जोडे तसेच गहू-तांदूळ अशा सर्व आवश्यक वस्तूंचा समावेश होता.

तसेच वधू-वरांसह उपस्थित हजारो नागरिकांसाठी मोफत भोजनाची भव्य व्यवस्था शाहीन फाउंडेशनतर्फे करण्यात आली. विशेष मान्यवर, सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि विविध मोहल्ल्यांतील टीम्सचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यात शहर काजी अमजद अली काजी यांच्या उपस्थितीत निकाह विधी पार पडले. महिला स्वयंसेविकांनी वधूच्या संपूर्ण तयारीपासून व्यवस्थापनापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

शाहीन फाउंडेशनने गेल्या 04 वर्षांत शेकडो कुटुंबांना आधार देत समाजात एक सकारात्मक बदल घडवून आणला असून, हा उपक्रम सोलापूर शहरासाठी अभिमानास्पद असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

... या पदाधिकाऱ्यांनी बजावली मोलाची कामगिरी

शाहीन फाउंडेशन-प्रमुख पदाधिकारी : संस्थापक अध्यक्ष एम. उमर शरीफ मर्चंट, उपाध्यक्ष : जिलानी कुरेशी, मिन्हाज हत्तुरे, सेक्रेटरी : सईद नाईकवाडी, जॉईंट सेक्रेटरी : जावेद जाण्या, कार्याध्यक्ष : राजा बागवान, खजिनदार : बाबा हाजी कुरेशी, क्षेत्रीय व सहकारी सदस्य : वीर कुरेशी, हाजी शाकाहारागार, समीर तांबोळी, इब्राहिम शेख, सनाउल्लाह क्षिरसागर, रेहान शेख, अमजद बागवान, काशीम कामलीवाले, सत्तार उस्ताद जुबेर, वसीम शेख, जक्रीया कामाते, आरिफ शफीक कुरेशी (मुंबई), आबिद शेख, एजाज बागवान, सिराज इनामदार, इम्तियाज कामतीकरायल, डॉ. आरिख (पुणे), तौसीफ, नासीर पिरजादे, फेरोज पिरजादे, माजिद, जब्बार उस्ताद, बाबा सिंदगीकर, वसीमराजा बागवान तसेच इतर सर्व मित्रपरिवार व सहकारी.

... असा आहे शाहीनच्या सामुहिक विवाहांचा प्रवास :

26 जानेवारी  2023 – 33 विवाह

28 जानेवारी  2024 – 60 विवाह

26 जानेवारी 2025 – 75 विवाह 

25 जानेवारी 2026 – तब्बल  90 विवाह

25 जानेवारी 2026, रविवार

🕌 नमाजे असरनंतर

📌 एम. ए. पानगल उर्दू हायस्कूल (ईदगाह मैदान), सिद्धेश्वर पेठ, सोलापूर

👉 महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था

👉 मगरीबनंतर जेवणाची दावत       

To Top