सोलापूर : नामदेवराव (बापू) भालशंकर गौरव समिती सोलापूर आयोजित नामदेवराव भालशंकर यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त ज्ञानवंत, प्रज्ञावंत, शीलवंत, गुणवंत मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि मातोश्री रुक्मिणी फाऊंडेशन सोलापूर या ट्रस्टच्यावतीने स्पर्धा परीक्षा देणारे हुशार, होतकरु आणि गरजू तसेच निराधार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप समारंभ तसेच सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाऊंडेशनच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या संविधान गौरव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक व सन्मानचिन्ह वितरण शनिवारी, 27 डिसेंबर रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता येथील शिवस्मारक सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली. पुरस्कार वितरणाचे यंदाचं 12 वं वर्ष आहे.
यावर्षीच्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये...
*तथागत भगवान गौतम बुध्द धम्मरत्न पुरस्कार - आनंद जाधव (सरचिटणीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती ॲन्टॉप हिल, मुंबई),
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर समतारत्न पुरस्कार - चंदा कासले (लेफ्टनंट जनरल- समता सैनिक दल, मुंबई),
*राजर्षी शाहू महाराज जीवनगौरव पुरस्कार - दिलीपराव चौगुले (अध्यक्ष- नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ, कासेगांव, तालुका दक्षिण सोलापूर.),
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार - डॉ. सुरेश कोरे (सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्ते),
*क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले समाजरत्न पुरस्कार - युवराज पवार (सामाजिक कार्यकर्ते), 
*राजर्षी शाहू महाराज उद्योगरत्न पुरस्कार - शंकर चौगुले (संस्थापक अध्यक्ष- बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सोलापूर),
*क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार - लाडजी बागवान (उपशिक्षक-जि. प. प्राथमिक शाळा, ता. अक्कलकोट),
*राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार - मयुर प्रधान (वरिष्ठ सहाय्यक - शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे),
*राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार - मनोहर कुंभार (सेवक- संघमित्रा माध्यमिक विद्यालय, कुर्डूवाडी, ता. माढा.),
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार - विश्वभूषण लिमये (उपसंपादक-साम टि. व्ही. मराठी), राहुल भालशंकर, ( संपादक- तेजस न्यूज, महाराष्ट्र),
*तथागत भगवान गौतम बुध्द विशेष गौरव पुरस्कार - सम्यक विचार मंच-मिलिंद व्याख्यानमाला, सोलापूर 
या सत्कारमुर्तीचा सपत्नीक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ, शाल, वृक्षाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
याच समारंभात मातोश्री रुक्मिणी फाऊंडेशन सोलापूर या ट्रस्टच्या वतीने जिल्हयातील अनाथ, निराधार, गरजू विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा (एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी) देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात येणार आहेत.
यावेळी गौरव समितीचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, सचिव प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, रमेश लोखंडे, प्रा. युवराज भोसले, रवी देवकर, उपप्राचार्य प्रकाश शिंदे, निलकंठ शिंगे, मिलिंद भालशंकर, दाऊत आतार, प्रा. डॉ. राजदत्त रासोलगीकर उपस्थित होते.
