सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर होण्यापूर्वीच सर्वच पक्षाचे इच्छुक उमेदवार आपापल्या पक्ष पातळीवर आपल्या समाज मनातील संपर्काच्या ताकदीनुसार पक्षाकडं उमेदवारीची मागणी करीत आहेत. भारतीय जनता पक्षाकडं मनपा प्रभाग क्रमांक 08 मध्ये सक्रीय समाजसेवक तथा रुग्णसेवक आनंद मधुकर गोसकी यांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडं इच्छुक म्हणून मुलाखत दिली आहे. आनंद गोसकी यांच्याकडं प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जातंय.
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद मधुकर गोसकी 2014 पासून भाजपासाठी निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्य करित आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांनुसार समर्पित भावनेने पक्ष कार्याबरोबर गेल्या 12 वर्षापूर्वी घेतलेले रुग्णसेवा अन् समाजसेवेचे व्रत आजपावेतो सुरू असून यापुढंही अखंडीतपणे सुरू राहणार आहे.
आनंद गोसकी वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रात अविरत कार्य करीत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे तात्कालीन प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या सहयोगानं अर्थसहाय्य निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असंख्य रूग्णावर महागड्या शस्त्रक्रिया करण्यात मोलाची भूमिका बजावली. 
रुग्णसेवक म्हणून सेवाभावी कार्य करीत असताना, दुर्दैवानं एखादा रुग्ण दगावला वा एखाद्या हॉस्पिटलने बिल भरण्याच्या तगाद्यात नातेवाईकांना मृतदेह देण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून ते बिल माफ करून घेण्यापर्यंतही गोसकी यांनी प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणं सामान्य जनतेने अनुभवली आहेत.
आनंद गोसकी, 2014 पासून दरवर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, गरजूंना ब्लॅन्केट वाटप अशा सामाजिक विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजसेवा अन् पक्ष कार्यकर्त्यांची फळी तयार करीत आले आहेत. 
त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुढं आलेल्या पी. एम. स्व निधी, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजना, महात्मा फुले आरोग्य योजना यासह सर्व योजना तळा-गाळातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचव्यात यासाठी निरंतर प्रयत्न करीत आले आहेत. 
गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून मदत, तसेच सर्व शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिरे आयोजित केली आहेत. भारतीय जनता पक्षाचे सदस्य नोंदणी कार्यक्रम, पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे, आयुष्यमान भारत, उज्ज्वला योजना, स्व निधी योजना या केंद्रीय योजना समाजातील वंचित दिव्यांग बांधवांना लाभ शिबिराच्या माध्यमातून आनंद गोसकी यांनी मदतीचा हात दिला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामधून केवळ सोलापूर शहर-जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील अगणित रुग्ण व गरजू लोकांना वैद्यकीय मिळवून देण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून व अनमोल सहकार्यानं मोलाची मदत मिळाली, हे सर्व केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यामुळंच अशक्य ही शक्य झाल्याची भावना ते बोलून जातात.
आनंद गोसकी सामान्य कुटुंबातील असल्यानं गरीबीचं दुःख अन् हेळसांड त्यांनी जवळून अनुभलेली असल्यानं ते तळमळीनं पीडित रुग्णांना, समाजातील वंचित, दिव्यांग बांधवांना रात्रंदिवस 24X7 मदत करीत आलेले आहेत. गोर-गरीब रुग्णांसाठी शेकडो आरोग्य शिबीरे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून गरजू वंचित रुग्णांच्या शस्त्रक्रीया, अनेक लोकांना रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबीर राबविण्यात येते. आजवर हजारो रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. गरीब व गरजू रुग्णांना मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया, उपचाराअभावी वा पैशाअभावी एखादा रुग्ण मृत्युमुखी पडता कामा नये, असा आनंद गोसकी यांचा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे.
अनेक गरजू रुग्णांना 05 लाख रूपयांपर्यंत मोफत विमा असलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या गोल्डन कार्ड तयार करून मिळवून देणे, या कार्डद्वारे लाभार्थ्यांना मोफत उपचार, प्रधानमंत्री उज्वला योजनेतंर्गत चूल मुक्त भारत योजनेंतर्गत शहराच्या विविध भागातील 450 पेक्षा अधिक महिला-भगिनींना मोफत गॅस कनेक्शन, शेगडी, रेग्युलेटर वाटप, अनेक रुग्णासांठी स्वतःचा वेळ देऊन मुंबई-पुण्यासारख्या मोठ-मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळवुन देण्यास व जीव वाचविण्यात यश आलं. 
श्रावण बाळ, निराधार योजना, अपंग, विधवा, निराधार, घटस्फोटीतांना हा लाभ व कुटुंब अर्थसाह्य योजनेतून पेन्शनही आनंद गोसकी यांनी आर्थिक मदत मिळवून दिली. नागरिकांना मोफत शैक्षणिक दाखले व वैद्यकीय दाखले मिळवून दिले. 
कोरोनासाररख्या महामारीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आनंद गोसकी यांनी त्यांच्या जनआधार फाऊंडेशनकडून बेघर, मनोरुग्ण, व गरजू लोकांना जेवण व धान्य कीट वाटप, लॉकडाऊन अडकलेले लोकांना दोन वेळेचं जेवण, कोरोनामुळे परिसरात भितीचे वातावरण असल्याने जनआधार फाउंडेशनकडून लोकांची घरोघरी जाऊन थर्मल स्क्रिनिंगद्वारे आरोग्याची प्राथमिक तपासणी करून कोरोना विषयक जनजागृती, अर्सेनिक अल्चम 30 गोळ्या, मास्क, सेनिटायझर, गोळ्या आनंद गोसकी यांनी जनआधार फाउंडेशकडुन कुटुंबियांना मोफत वाटप करण्यात योगदान दिले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेला आनंद गोसकी राज्याच्या अनेक भागातील समाजसेवी संस्थांनी त्यांच्या या कार्याचं कौतुक करुन त्यांना सन्मानित केलं. 
शहर उत्तर चे आमदार विजयकुमार देशमुख, विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर मध्य चे आमदार देवेंद्र कोठे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्यानं हे समाजकार्य करता आल्याचं आनंद गोसकी यांनी म्हटलं असून साखर पेठ परिसरातील माजी नगरसेवक व प्रभागातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते बूथ प्रमुख यांना विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधींचे आणि सर्वांना विचारात घेऊन पुढे काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. 
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आनंद मधुकर गोसकी यांना राज्य शासनाकडून तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं, हा देखील पक्ष आणि समाजकार्यातील मैलाचा दगड ठरतोय. पक्षश्रेष्ठी आनंद गोसकी यांच्या सामाजिक कार्य अन् समाजसेवेची दखल घेतील, अशी आशा सामान्य जनांना आहे, मात्र पक्षश्रेष्ठींनी संधी दिली तर माझ्यासाठी सुवर्ण क्षण असेल, असं आनंद गोसकी यांनी म्हटलंय.
... चौकट ...
... असा आहे 'आनंद' मय समाजकार्याचा प्रवास अन् सन्मान !
महाराष्ट्राचे तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या स्वाक्षरीने सन्मानपत्र देऊन राजभवन येथे सन्मान
लोकनेते राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद गोसकी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भविष्याच्या राजकीय सामाजिक कार्यास संघटनात्मक कार्यास शुभेच्छा पत्र
केंद्रीय सडक परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आनंद गोसकी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भविष्याच्या राजकीय सामाजिक कार्यास शुभेच्छा पत्र
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी यांच्याकडून सन्मानित
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश अध्य चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपा सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत 1000 नुतन सदस्य नोंदणी केल्याबद्दल प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण यांच्याकडून शुभेच्छा पत्र
संकल्प बहुद्देशिय संस्था, नाशिक यांच्याकडून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्राताई वाघ यांच्याकडून सन्मानपत्र
दै. तरुण भारत संवाद यांच्याकडून पुरस्काराने सन्मानित
अपरिचित सामाजिक संस्थेकडून सोशल आयकॉन 2018 पुरस्काराने सन्मानित
कांचन फाऊंडेशन, सोलापूर यांच्याकडून कोव्हिड योध्दा म्हणून सन्मानित
दैनिक भास्कर समुहकडून 'जिओ दिल से' पुरस्काराने सन्मानित विशेष महाराष्ट्रातून गोसकी यांची निवड)
कोरोनाच्या काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडून सन्मानपत्र
आदर्श बहुद्देशिय संस्था नांदेड यांच्याकडून सन्मानित
पत्रकार सुरक्षा समिती राज्यस्तरीय पुरस्कार व आरोग्यदुत म्हणून सन्मानित
युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तर्फे कोरोना सैनिक म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव
आमची वसई मुंबई सामाजिक संस्थातर्फे कोव्हिड योध्दा म्हणून गौरव
द इंटरनॅशनल लायन्स क्लब सेंट्रल तर्फे रियल फाइटर म्हणून सन्मान
सिटी फायटर युथ फाऊंडेशनतर्फे कोरोना योध्दा म्हणुन सन्मानित
पोलिस विद्यार्थी संघटनातर्फे कोरोना योध्दा सन्मानित अपरचित सामाजिक संस्थेतर्फे कोरोना रक्षक म्हणून सन्मानपत्र
तंजिम हमदर्द ए इन्सानियत एज्युकेशन वेल्फेअर ॲन्ड चॅरिटेबल ट्रस्टकडून कोरोना योद्धा सन्मान
सोलापूर पोलिस प्रशासनाकडुन सन्मानित
पोलिस भरती विद्यार्थी संघर्ष समितीकडून सन्मानपत्र
मराठी स्वराज्य संघ, सन्मानपत्र
बाबुराव डिसले जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार, बार्शी
...........
