AIMIM चे प्रवक्ते अमितकुमार अजनाळकर यांचा शिवसेनेत प्रवेश

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर AIMIM चे माजी शहर उपाध्यक्ष आणि प्रवक्ते अमितकुमार अजनाळकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन, शिवसेनेचे उपनेते माजी आमदार व संपर्क प्रमुख संजय कदम यांच्या उपस्थितीत गुरुवारी, शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. संपर्क प्रमुख संजय कदम यांनी अमितकुमार अजनाळकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.

अमितकुमार अजनाळकर यांनी 2019 मध्ये सोलापूर दक्षिण विधानसभा निवडणूक MIM पक्षाकडून लढवली होती. पोलीस भरती अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं समाजकार्य आजवर केलं आहे. 

भविष्यकाळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याचे अमितकुमार अजनाळकर यांनी पक्षप्रवेशानंतर बोलताना सांगितले.

याप्रसंगी माजी आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शिवसेना राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे,  जिल्हाप्रमुख अमर पाटील, अमोल शिंदे, शहर प्रमुख सचिन चव्हाण, महिला जिल्हा संपर्क प्रमुख अनिता माळगे, माजी जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक मनोज शेजवाल, माजी जिल्हा प्रमुख मनीष काळजे, अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख एजाज शेख, शहर प्रमुख गफूर शेख, उप शहर प्रमुख मोईन शेख, संपर्क प्रमुख रजाक मालक मुजावर, मोहसीन शेख आदींच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला.

To Top