79 व्या राष्ट्रीय संतोष ट्रॉफी फुटबॉलसाठी महाराष्ट्र वरिष्ठ फूटबॉल संघात रेहान मुल्ला यांची निवड

shivrajya patra

सोलापूर : जयपूर, राजस्थान होणाऱ्या 79 व्या राष्ट्रीय संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्र वरिष्ठ फूटबॉल संघात सोलापूर सोशल असोसिएशन आर्टस ॲण्ड कॉमर्स, सोलापूरच्या बी. ए. भाग-01 चा विद्यार्थी रेहान मुल्लाची निवड करण्यात आली आहे. 

रेहान मुल्ला सोलापूरचा उत्कृष्ट फुटबॉलपटू आहे. तो सातत्याने सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत सोलापूरचे प्रतिनिधित्व करीत आहे. तसेच अखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत आहे. 

यशस्वी खेळाडूस वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेचे सचिव डॉ. के. पी. चौगुले, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. मुश्ताक शेख व तलहा शेख यांचं मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी, वरिष्ठ-कनिष्ठ प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळ : यशस्वी खेळाडूसोबत प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी व डॉ. मुश्ताक शेख.

To Top