सोलापूर : नळदुर्गचे शहर काझी अहेमदअली उर्फ पाशामिया मैनोद्दीन काझी (रा.काझी गल्ली, नळदुर्ग) यांचे बुधवारी,17 डिसेंबर रोजी सकाळी राहत्या घरी वृध्दापकाळी निधन झाले. ते मृत्यू समयी 85 वर्षीय होते. गावातील सोहेलखान मुस्लिम कब्रस्तानमध्ये रात्री इशा नमाजनंतर त्यांचा दफन विधी (सुपूर्द-ए-खाक) झाला.
त्यांच्या अंत्ययात्रेत मुस्लिम धर्मगुरू, समाज बांधव, नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, पाच मुले, सुना, जावई, नातू-पतवंडे असा मोठा परिवार आहे.
काझी अहेमद अली यांच्या घरी पूर्वजांपासून शहर काझीची सनद होती. सात-आठ पिढ्यानंतर शहर काझी म्हणून हा वारसा त्यांना मागील 50-60 वर्षांपासून मिळाला होता.
नळदुर्ग शहरातील शहर काझी म्हणून त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिक व निःस्वार्थ सेवा बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कुटुंबांचे संसार उभे राहिले. समाजात धार्मिक सलोखा, एकोपा आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचं त्यांचं योगदान मोलाचं मानलं जातं.
त्यांच्या माध्यमातून नळदुर्ग शहरात अनेक समाजोपयोगी उपक्रम, धार्मिक कार्यक्रम तसेच जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या निधनावर अनेकांनी दुःख व्यक्त केलंय.
