अनेक गुन्हे दाखल; जाधव तडीपार

shivrajya patra

सोलापूर : येथील सेटलमेंट फ्रि. कॉलनी नं. 06 मधील रहिवासी ऋतिक बजरंग जाधव नावाच्या 24 वर्षीय तरूणास सोलापूर पोलीस आयुक्तालयानं सोलापूर आणि शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातून 02 वर्षांकरिता तडीपार केलंय. 

ऋतिक याच्याविरुध्द सन 2019, 2023 तसेच यंदाच्या वर्षात, गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा-मारामारी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडा आणि घरफोडी यासारखे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

त्याच्याविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) कार्यालयाकडं सादर करण्यात आला होता. त्यानुसार ही तडीपारी करण्यात आल्याचं माहिती कक्षातून सांगण्यात आलंय.


To Top