फूड फेस्टिवल-विद्यार्थ्यांसाठी उज्वल भवितव्याची नवीन दिशा : अय्युब नल्लामंदू

shivrajya patra

विद्यार्थ्यांनी घेतले दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या कौशल्याचे धडे

सोलापूर : महानगरपालिका मुलांची उर्दू केंद्र शाळा, क्रमांक 05 मध्ये शनिवारी रोजी शाळेमध्ये फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी या माध्यमातून स्वतः विक्री करून पाक-कला, व्यवहार कुशलता, नफा–तोटा, दर ठरविणे तसेच खरेदी–विक्री यांसारख्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या कौशल्यांचं उत्कृष्ट प्रदर्शन करीत धडे घेतले.

फूड फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांनी एकूण २३ स्टॉल्स लावून विविध स्वादिष्ट व आकर्षक पदार्थांची प्रस्तुती केली. यामध्ये गुलाब जामुन, दहीवडा, कस्टर्ड, कद्दू की खीर, पाणीपुरी, कबाब, समोसे इत्यादी पदार्थांचा समावेश होता. यावेळी खालिद मणियार, अय्युब नलामंदू, मज़हर अल्लोळी तसेज इम्तियाज नदाफ यांची प्रमुख अतिथी म्हणून  उपस्थिती होती.

पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले आणि सांगितले की, विद्यार्थ्यांना फूड फेस्टिवलसारख्या उपक्रमांमुळे भविष्यात पाककला क्षेत्रात व विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये नवीन संधी मिळू शकतात.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आफरीन शेख तसेच शिक्षकवर्ग जिनत पगडीवाले, रूपाली कांची, शबाना जामदार, महबूबी शहापुरे, नाझिया रजभरे, शहाबुद्दीन रचभरे, महादेवी कालीकोटी आणि फूट फेस्टिवल संयोजक इम्ररान जमादार यांचं विशेष योगदान लाभलं.

कार्यक्रमास विद्यार्थ्य, पालक व शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

To Top