पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचं 07 डिसेंबर रोजी व्याख्यान

shivrajya patra

 

सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने राष्ट्रीय वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचं रविवारी, 07 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.25 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात, 'भारत का भविष्य' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरचे देवगीरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. अशी माहिती अध्यक्षा रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.

भारतीय राजकारण आणि भारतीय इतिहासाची मांडणी करणारे ज्येष्ठ पत्रकार तथा अखंड हिंदु राष्ट्राचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील असलेले सामाजिक कार्यकर्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या वाणीतून भारतीय इतिहास तसेच भारताचे भविष्य यावर विचार ऐकण्याची संधी सोलापूरकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्रा.दीपक देशपांडे, कार्यवाह जितेश कुलकर्णी,कोषाध्यक्ष अमोल धाबळे, कार्यकारणी सदस्य प्रकाश मोकाशे, पृथा हलसगीकर, मेधा कुलकर्णी, अविनाश महागांवकर, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर आदी कार्यरत आहेत. 

व्याख्यानाला येणार्‍या नागरीकांच्या सोईसाठी हुतात्मा स्मृती मंदिराच्या आवारात स्क्रीन, खुर्च्या आणि स्पिकरची व्यवस्था करण्यात आली आहे. सभागृहातील पहिल्या तीन रांगा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावं, असं आवाहनही यावेळी करण्यात आलं आहे. 

To Top