बालकांना 'सिग्नल पॉईंट' वर मागायला लावली भीक; महिलेविरुध्द गुन्हा दाखल

shivrajya patra

सोलापूर : रहदारीच्या सिग्नल पॉईंटवर बालकांना भीक मागायला लावणाऱ्या महिलेविरूध्द सदर बझार पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. जैताबाई महादेव पवार वय (वय- अंदाजे 40 वर्षे) असं आरोपीत महिलेचं नांव आहे. पोलिसांनी सर्व बालकांना बाल कल्याण समितीसमोर हजर करून त्यांना बालगृह येथे ठेवण्यात आलंय.

शहरातील सिग्नल चौकात उभे राहून भीक मागणारी लहान मुले, स्त्रिया, पुरूष यांच्यावर कारवाई करिता अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस अंमलदार व दामीनी पथक विभाग 01 व विभाग 02 यांचे पथक नेमण्यात आलंय.

गुरुवारी, 04 डिसेंबर रोजी सायंकाळी महावीर चौक या ठिकाणी पेट्रोलिंग करीत असताना चौकातील सिग्नलवरील थांबण्याऱ्या प्रवाशाकडे भीक मागताना 01 महिला व तिच्यासोबत 03 बालके दिसून आली. त्यांच्याकडं चौकशी केली असता, त्या महिलेचं नांव जैताबाई पवार (रा. जुना विजापूर नाका, पारधी वस्ती, सोलापूर.) असं असल्याचं निष्पन्न झालं. ती सर्व बालके भीक मागत असताना पथकास मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यानुसार जैताबाईविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. श्रीमती अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त राजन माने, पोलीस निरिक्षक धनाजी शिंगाडे यांचे मार्गदर्शनाखाली मसपोनि श्रीमती स्वाती येळे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पथक तसेच दामीनी पथक विभाग 01 व विभाग 02 यांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडलीय.

To Top