सोलापूर : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी पान मंगरूळ येथील नूतन विद्यालयातील शिक्षक गंगाधर भीमाशंकर शिवशरण यांची निवड झाली आहे.
महासंघाच्या सभेत अक्कलकोट तालुका सचिवपदी सिद्राम मुली यांची तर कार्यकारिणी सदस्य म्हणून जयदीप गायकवाड यांची निवड झाली. प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे, राज्य कोषाध्यक्ष नीलकंठ शिंगे, जिल्हा अध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा सरचिटणीस रवि देवकर, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष नितीन गायकवाड, माढा तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जानराव, बार्शी तालुकाध्यक्ष धनाजी धिमधीमे, महिला जिल्हा प्रतिनिधी निर्मला मौळे, इन्नुस बाळगी, महिबूब तांबोळी आदी पदाधिकारी-सभासद उपस्थित होते.
