सोलापूर : माननीय श्री संभाजीराव जनार्धन वाडकर सार्वजनिक वाचनालय कासेगांव यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या नूतन वर्ष 2026 च्या दिनदर्शिकेचं प्रकाशन रविवारी सायंकाळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद पवार आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. 
कार्यक्रमाची सुरूवात कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय राठोड यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यांनतर प्रमुख पाहुण्यांचा फेटा व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद पवार (धाराशिव) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुस्तकांचे आपल्या आयुष्यातील महत्व सांगून, त्यांच्या वतीने 05 हजार रुपये किंमतीचे ग्रंथ वाचनालयाला भेट म्हणून दिले.
त्यांनतर दक्षिण सोलापूर पंचायत समिती माजी उपसभापती अप्पा धनके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रम अध्यक्ष विजय राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेस सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक महेश वाडकर यांनी केले. सूत्रसंचालन भरत जाधव यांनी तर नितीन वाडकर यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.
यावेळी माजी सरपंच महादेव जाधव (गंगेवाडी), उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे (कासेगांव), माजी सरपंच जनार्धन काळे (कासेगांव), माजी सदस्य संतोष भोजणे (कासेगांव), बापू जाधव (गंगेवाडी), माजी तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, बबन खारे, शिवाजी हेडे, हरी गरड, सुरज परीट, तात्या चौगुले, अक्षय माळी, अजित जाधव, नवनाथ माने, लक्ष्मण ढेकळे, तुकाराम चौगुले, तानाजी हब्बू व गावातील अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
