सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेना व जनविकास क्रांती सेनेच्या वतीने महिला प्रमुख स्वाती शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले व जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी पदाधिकारी-कार्यकत्यांसह अभिवादन केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुचन नगर, पद्मशाली चौक, येथील महाराष्ट्र कामगार सेना व जनविकास क्रांती सेनेच्या वतीने कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. 
याप्रसंगी विठ्ठल कुऱ्हाडकर, रेखा आडकी, गुरुनाथ कोळी, नागमणी येलदंडी, सविता इडप,अजय कारमपुरी, राधा गाजूल, बालाजी मेटकू, राधाबाई कुणगेरी, प्रसाद जगताप, अक्षय चिलवेरी, वंदना चारगुंडी अनुराधा भैरी, शुभम कारमपुरी, राधिका बोंबल, सरस्वती गोसकी, निर्मला गुंडला, अंबव्वा वंगा, उमा बालाजीवाले, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख आदी उपस्थित होते.
