सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त समता सैनिक दल शहर-जिल्हा सोलापूर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. 
समता सैनिक दलाच्या जीओसी सुमित्रा केरू जाधव, माजी जी. ओ. सी. आणि ज्येष्ठ सल्लागार समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, महासचिव अनिल जगझाप यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
यावेळी समता सैनिक दलाचे सुचित्रा थोरे, ज्येष्ठ सैनिक विठ्ठल थोरे, अंगद जेटीथोर, माणिक आठवले, बाळासाहेब मस्के, संभाजी तळभंडारे,रत्नदीप कांबळे, मुकुंद चंदनशिवे, चंद्रकांत कोळेकर, सुनिल डांगे, विनोद जाधव, भारत आवारे, अंकुश बनसोडे, शाहू दावणे, बिगलर समाधान रसाळ, अरुण भालेदार, सुरज प्रक्षळे, सुजित हावळे, प्रज्वल डोळसे, शिवशरण ताई, प्रीती जाधव, वर्षा जाधव इत्यादी पुरुष आणि महिला सैनिक उपस्थित होते.
