महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव बास्केटबॉल स्पर्धेकरिता सोशल च्या खेळाडूंची निवड

shivrajya patra

सोलापूर : रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव बास्केटबॉल स्पर्धेकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संघामध्ये सोशलच्या मोईन सय्यद, मोहम्मद दानिश शेख व ऊसेफ नगार या 03 खेळाडूंची निवड करण्यात आली. वरील स्पर्धेत विद्यापीठातर्फे या सर्व खेळाडूंनी सुरेख व उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. मुश्ताक शेख आणि  तलहा शेख यांचं मार्गदर्शन लाभले.

विजयी संघाचे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी, वरिष्ठ-कनिष्ठ प्राध्यापक वर्ग व तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळ- यशस्वी खेळाडूंसोबत प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी व डॉ. मुश्ताक शेख छायाचित्रात दिसत आहेत.

To Top