उत्तर सोलापूर : खेळ हे जीवनाचे अविभाज्य अंग असून खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, सहकार्य, शिस्त, आणि खेळाडू वृत्ती या गुणांचा विकास होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तन-मन-धन ओतून या स्पर्धेमध्ये आपले नाव रोशन करावे आणि मिळालेल्या संधीचे सोने करावे, असं आवाहन पोलीस अंमलदार विशाल सावंत यांनी केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर येथे आयोजित केलेल्या क्रीडा सप्ताहाचा प्रारंभ झाला. या क्रिडा सप्ताहाचं उद्घाटन सोमवारी, 15 डिसेंबर रोजी पोलीस अंमलदार विशाल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस अंमलदार सावंत उद्धाटन प्रसंगी बोलत होते. 
यावेळी निर्भया पथक च्या रणरागिणी महानंदा स्वामी अंमलदार किरण तोडेकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत आणि ग्रामपंचायत सदस्य शशिकांत भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच शिवाजी निळ होते.
आजची हार सुद्धा उद्याची जीत घेऊन येत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पराभव झाला तरी खचून जाऊ नये, असंही अनमोल मार्गदर्शन पोलीस अंमलदार विशाल सावंत यांनी याप्रसंगी केले.
त्यानंतर संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ यांनी आजवर विद्यार्थ्यांनी केलेली क्रीडा स्पर्धेतील चमकदार कामगिरीचे आराखडा सादर केला. त्यानंतर प्रथम सामना कबड्डी जिजाऊ आणि सावित्री या दोन प्रतिस्पर्धी संघांमध्ये संपन्न झाला. 
हा त्यानंतरच्या सत्रामध्ये कबड्डी, खो-खो, धावणे, क्रिकेट, लिंबू चमचा गोळा फेक असे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून तीन दिवस क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात क्रीडा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. क्रीडा शिक्षक दिलीप भोसले आणि सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब नीळ यांनी केले.

