सोलापूर : आमदार विजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रविण दर्गोपाटील मित्र परिवार यांच्या वतीने रविवारी, 16 नोव्हेंबर रोजी शुक्रवार पेठ येथील महावीर मंगल सांस्कृतिक मंगल कार्यालयात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मोफत आरोग्य सेवेचा महायज्ञ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक प्रविण दर्गोपाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या शिबिरामध्ये कॅन्सर, हृदयरोग, बालरोग, स्त्रीरोग, डोळ्यांचे आजार, हाडांचे विकार, पोटाचे व मूत्रविकार, दंतचिकित्सा, त्वचारोग, नाक-कान-घसा अशा विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व उपचार दिले जाणार आहेत. त्याचबरोबर या उपक्रमांतर्गत नागरिकांना मोफत उपचार, तपासण्या तसेच मोफत आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही आयोजक प्रविण दर्गोपाटील यांनी सांगितले.
या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख आणि माजी नगरसेवक डाॅ. किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. आरोग्यदायी समाजासाठी या महायज्ञ सर्वांनी लाभ घ्यावा आणि तो यशस्वी करावा, असं आवाहन आयोजक प्रविण दर्गोपाटील मित्र परिवाराकडून करण्यात आले.
या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक अमर पुदाले, गुरुनाथ निंबाळे, सचिन कुलकर्णी, मोहन क्षीरसागर, श्रीशैल सास्तुर, रवि अतनुरे, श्रीनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
