मुळेगाव रोड सुजाता नगरातील रहिवासी सलमान उर्फ वॉन्टेड इरफान याच्याविरुध्द सन 2013, 2019, 2023 आणि 2025 या कालावधीमध्ये साथीदारांसह दंगा व मारामारी करणे, घातक शस्त्राचा वापर करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन सलमान उर्फ वॉन्टेंड होटगीकर याला तडीपार केलंय.
अनिल उर्फ काल्या राजु चौगुले असं दुसऱ्या तडीपाराचं नांव असून अनिल उर्फ काल्या (वय-30 वर्षे, रा. मड्डी वस्ती, सोलापूर) याच्याविरुध्द सन 2018 व 2024 या कालावधीमध्ये चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांच्याकडं तडीपार प्रस्ताव आला होता. त्यास सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून तडीपार केलं आहे.
