आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत सोशल महाविद्यालयाला अजिंक्यपद

shivrajya patra

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत अंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत सोलापूर सोशल असोशिएशन्स संचलित सोशल महाविद्यालयाने अजिंक्यपद पटकाविले.

येथील सोलापूर शहर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शनिवारी, 22 नोव्हेंबर रोजी विद्यापीठ अंतर्गत अंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण तीन संघानी सहभाग घेतला होता. त्यात सोशल महाविद्यालयाने अंतिम सामन्यात सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगांव विरुद्ध 1-0 ने विजय मिळवत अंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. 

या स्पर्धेत सोशल महाविद्यालयातर्फे कर्णधार अमजद अली शेख, रेहान मुल्ला, अयान काखंडीकर, अबू हुरेरा सालार, समिउल्लाह आरेवाले व गोल रक्षक मोईन सय्यद यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. त्यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विजयी संघास महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. मुश्ताक शेख आणि तलहा शेख यांचे मार्गदर्शन लाभले. 

विजयी संघाचे सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

फोटो ओळ : विजयी संघासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी, डॉ. मुश्ताक शेख, तलहा शेख आणि कर्णधार अमजद अली शेख यांच्या महाविद्यालयाचा हॉकी संघ दिसत आहे.

To Top