मुंबई/सोलापूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचं 56 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी निधन झाले. नुकतेच 01 ऑक्टोबर रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. जसलोक रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. 
त्यांच्या अकाली निधनाने रेल्वे प्रशासनात मोठी पोकळी निर्माण झाली असून, रेल्वे मंत्रालयापासून सर्व स्तरांवर शोककळा पसरली आहे. ते चार दिवसांपूर्वीच सोलापूर विभागाच्या दौऱ्यावर आले होते.
