भारतरत्न अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त राष्ट्रवादीकडून अभिवादन

shivrajya patra

सोलापूर : ज्ञान, समानता आणि प्रगतीचा मार्ग दाखवणारे, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची 137 वी जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 'राष्ट्रवादी भवन' येथे त्यांच्या प्रतिमेस ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सलीम नदाफ, अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव फारूक मटके यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षणमंत्री आणि स्वातंत्र्य सैनिक मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षणाला राष्ट्रीय विकासाचा मूलभूत पाया मानत देशाच्या शैक्षणिक धोरणाला दूरदृष्टी दिली. प्रत्येक नागरिकाला मोफत आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळावे, हा त्यांचा द्रष्टा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे. 

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव, मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष संजय मोरे, सहकार सेल अध्यक्ष भास्कर आडकी, निशांत तारानाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते .

To Top