सोलापूर : येथील पोलीस आयुक्तालयाच्या www.solapurcitypolice.gov.in वेबसाईटचं नुतनीकरण आणि उद्घाटन पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्या हस्ते सोमवारी,03 नोव्हेंबर रोजी करण्यात आले.
www.solapurcitypolice.gov.in या संकेतस्थळाचे नुतनीकरणाचे काम पॉवरकोड टेक्नोलॉजी यांनी केलेले आहे. या संकेतस्थळावर खालील सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
नुतनीकरण केलेले नवे संकेतस्थळ इंग्रजी व मराठी भाषेमध्ये तयार करण्यात आले आहे. ही वेबसाईट ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आल्याने हे संकेतस्थळ डेस्कटॉप, लॅपटॉप व मोबाईलवर काही सेकंदात ओपन होणार आहे.
सिटीजन पोर्टलचे लिंक सोलापूर शहर संकेतस्थळावर देण्यात आल्याने सोलापूर शहर व संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन पध्दतीने तक्रार करता येणार आहे.
पत्रकार बंधु करीता प्रेस नोट संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पोलीस आयुक्त ते सहा. पोलीस आयुक्त यांची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
तसेच सर्व पोलीस ठाण्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मोबाईल नंबर, पोलीस ठाण्याचे पत्ता, GPS Location याबाबतची माहिती उपलब्ध आहे.
संकेतस्थळ हे फेसबुक व ट्विटरशी कनेक्ट करण्यात आलेली आहे, त्यामुळे सोशल मिडीयाशी कनेक्ट होण्यास मदत होणार आहे.
संकेतस्थळावर सोलापूर शहर नियंत्रण कक्षाचे Whatsapp नंबर व QR कोड दिला आहे, ज्याचा उपयोग करून नागरिक तक्रार व सूचना देऊ शकतात.
या संकेतस्थळावर आपले सरकार Website ची लिंक देण्यात आलेले आहे.
गुगल मॅप वरुन पोलीस ठाण्याचे अचुक लोकेशन मिळवता येणार आहे.
आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे व शाखा यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
स्वतंत्र अॅडमिन पॅनल दिलेले असल्याने संकेतस्थळावर दैनंदिन माहिती अद्यावत केली जाणार आहे.
संकेतस्थळ हे युझर फ्रेंडली असल्याने वापर करण्यास सोपी आहे.
वाहतूक शाखेशी संबंधी नियम व दंड याबाबतची माहिती उपलब्ध आहे.
महिला व नागरीक यांचे सुरक्षेविषयी सावध राहणेबाबतची माहिती सेफ्टी टिप्स या टॅब मध्ये उपलब्ध आहे.
सायबर सुरक्षेवर विशेष माहिती उपलब्ध आहे.
पोलीस आयुक्तालय संबंधीत माहिती अधिकार, पोलीस भरती विषयक माहिती, पोलीस विभागाचे विविध उपक्रमाचे जनतेसाठी लेटेस्ट न्युज, न्युज अॅन्ड इव्हेन्टस या टॅब मधुन मिळणार आहेत.
टेंडर या टॅबमधून निविदा डाऊनलोड करुन घेता येणार आहेत.
सदर संकेतस्थळावर नागरीक, गहाळ झालेले व सापडलेले वस्तू बाबत माहिती देऊ शकतात.
संकेतस्थळावर फरार व पाहिजे आरोपींची यादी प्रकाशित करण्यात आली आहे.
गुन्ह्यांची संख्या, प्रकार व त्यात झालेली कामगिरी दर्शवण्यासाठी नागरिकांसाठी अद्यावत DASHBOARD संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त अश्विनी पाटील (गुन्हे/विशा), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वपोनि श्रीशैल गजा (सायबर पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक प्रविण भोपळे, पोलीस उप-निरीक्षक नागेश इंगळे, पोअं/रतिकांत राजमाने, पोअं/इब्राहिम शेख तसेच पॉवरकोड टेक्नोलॉजीचे पंकज चव्हाण व त्यांची टीम यानी संकेतस्थळाचे नुतनीकरण करण्यास परिश्रम घेतलं आहे.
