झाडे लावू… पण जंगल उद्ध्वस्त करू! का ? - मंजुल भारद्वाज

shivrajya patra
पुणे : चहूबाजूला विकासाचे महामार्ग उभे आहेत! वेगवान गाड्या आहेत! प्रदूषण आहे! गोंगाट आहे! … आणि मृत्यू आहे!मृत्यू? कुठे?  अरे, त्या महामार्गावरच, जो एका चित्रपटातील नायिकेच्या गालासारखा गुळगुळीत आहे! पण हा मृत्यू आपल्याला दिसत नाहीत, कारण आपल्याला फक्त विकास आणि वेग दिसतो! कारण, महामार्गावर जे मरतात त्यांच्याकडे पाहायला आपल्याकडे वेळ नाही. आणि शोकांतिका म्हणजे, स्वतःकडे पहायलाही आपल्याला वेळ नाही!

आपली संवेदना संपली आहे. आपण आणि आपली गाडी दोघेही यंत्र झाले आहोत! जेव्हा की, जीवन म्हणजे संवेदना. 

बातम्यांकडे थोडंसं लक्ष द्या.  महामार्गावर कार, बस, ट्रक धगधगत जळत आहेत! त्या सोबत त्या ए.सी,बस-कारमधील प्रवासीही जळतात. का?

का? "का?" यासोबत आपले काही नातेच नाही. कारण का ? म्हणजे प्रश्नच आता आपल्या मेंदूत येत नाही!

आपल्या मेंदूत भरले आहे फक्त “विकास” आणि त्याचा जयकारा !

आपल्या डोळ्यांना दिसतं का ?  खरंच? डोळे उघडा आणि त्या महामार्गाकडे पाहा. तो कातडीविहीन मनुष्याच्या देहासारखा, फक्त सांगाड्यासारखा दिसतो! कारण त्याच्यावर उगवलेले प्रत्येक झाडं कापून टाकले आहे.

झाडं तोडून तो रस्ता सिमेंटचा, काँक्रीटचा बनवला गेला आहे. जो ना उन्हं रोखू शकतो, ना पावसाचं पाणी शोषू शकतो.

जेव्हा गाडी चालते, तेव्हा ए.सी.मुळे इंजिन आणखी तापतं.त्यावर उन्हाची झळ, आणि त्यावर तापलेला काँक्रीटचा महामार्ग. तीन पटीने तापमान वाढतं आणि तुमची ए.सी. कार ज्वालाग्रही गोळा बनते! पण आपण विचार करतो  “माझी गाडी तर जळली नाही ना!” आणि जी गाडी जळली, किंवा जो माणूस जळून मेला , त्याच्याशी आपलं काय देणं-घेणं?

थोडासा पाऊस झाला की महामार्ग तळं बनतो, कारण सिमेंट पाणी शोषत नाही आणि तिथे पाण्याचा निचरा ही होत नाही! असतो फक्त नफा तोही आपल्या मृत्यूच्या किंमतीवर !

आता अशा रस्त्यावरून प्रवास करून पहा, ज्याच्या दोन्ही बाजूंना हिरवी झाडं आहेत.

त्या रस्त्यावर झाडांची सावली आहे. तुम्हाला नक्की तापमानातील फरक जाणवेल. शीतल, प्रसन्न वातावरण!

पण आपण आपला मृत्यू निवडतो हीच शोकांतिका आहे .

आपल्याला ना अवकाळी पाऊस दिसतो, ना भूस्खलनाने उद्ध्वस्त झालेला हिमालय, ना पुर, ना आग, ना वादळ, ना विनाश !

“एक झाड लावा आणि जंगल उद्ध्वस्त करा” हे षडयंत्र आपल्याला कसे दिसणार ?

आपल्या प्रत्येक प्रियजनांच्या नावाने झाडं लावू आपण. फक्त आईच्या नावानेच का? पण लक्षात ठेवा, फक्त झाडं लावून पर्यावरण वाचणार नाही. पर्यावरण वाचेल जंगल वाचवून! आणि जंगल तर उद्ध्वस्त केलं जातंय, कारण आपला विकास व्हावा म्हणून!

सत्ता आणि भांडवलशाही आपल्याला मूर्ख बनवत आहेत. त्यांचा एक खेळ म्हणजे “प्रदूषणमुक्त गाडी”, “इको-कार”!

ज्यांच्या बॅटरीतील लिथियम जंगल उद्ध्वस्त करून, भूमिगत खनिजांमधून काढला जातो. पण आपल्याला काय? आपण सुशिक्षित आहात, गूगल ज्ञानाने परिपूर्ण ! जाहिरातींच्या झगमगाटातलं खोटं आपण खरं समजतो !

चहूबाजूंनी सुरू असलेली आपली लूट आपल्याला दिसत नाही !

पहिली लूट जंगलांची,

दुसरी भूमिगत खनिजांची,

तिसरी आदिवासींची,

चौथी खाडीमधून होते,

पाचवी महामार्गासाठी घेतलेल्या जमिनीची,

आणि शेवटी आपलीच गाडी, जी जळतं ताबूत बनून आपलं जीवनच लुटते!

असं कधी खरंच घडतं का? तर गूगलवर शोधा, मृत्यूंची आकडेवारी बघा! दोन्ही डोळ्यांनी पहा, जंगल बघा, त्यांना वाचवा, आणि झाडं लावा.

आपल्या पंचतत्त्वांशी युद्ध म्हणजे विकास नाही, विनाश आहे!

पंचतत्त्व, पर्यावरण, पृथ्वी आणि मानवता वाचवूया.

थिएटर ऑफ रेलेवंस प्रस्तुत

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित

नाटक : "द... अदर वर्ल्ड" (मराठी)

कधी : १५ नोव्हेंबर, शनिवार, सायं. ५.३०

कुठे : पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह, औंध, पुणे

संपर्क : प्रियंका कांबळे +919004017440

          कोमल खामकर +919653691401

To Top