ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते मोहम्मद अयाज यांना राष्ट्रीय अचिव्हर्स पुरस्कार !
मुंबई : महाराष्ट्राचे महागायक अन् सोलापूर जिल्ह्याचा भूमीपूत्र म्हणून आपल्या कलेच्या बळावर देश-विदेशात पोहोचलेले गायक मोहम्मद अयाज यांना राष्ट्रीय अचिव्हर्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. हा मानाचा पुरस्कार ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक व प्रख्यात निर्माता दिग्दर्शक मेहूल कुमार यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. 
मोहम्मद अयाज एक सामान्य शेतकरी कुटुंबातील कलाकार आपल्या प्रतिकूल परस्थितीवर मात करुन अंगी असलेल्या कलेस भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवून आपल्या सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक केलेला आहे. 
अयाज यांना देश-विदेशात अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वदेश फाऊंडेशन त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अचिव्हर्स पुरस्कार-2025 हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
या प्रसंगी उद्योगपती शाम सिंघानिया, अभिनेत्री अंकीता रावल, नताशा फर्नांडिस. दिग्दर्शक टिनू वर्मा, स्वदेश चे संजीव कुमार, आदित्य देशमुख, वैभव शर्मा, युसुफ शाकीर यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. 
हा भव्य सोहळा, 16 नोव्हेंबर रोजी येथील पंचतारांकित हॉटेल रेडिसन येथे पार पडला. हा पुरस्कार नक्कीच माझ्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचं मोहम्मद अयाज यांनी यावेळी म्हटले.
