बहुजन शिक्षक महासंघाच्या स्नेह मेळाव्यात समाजभूषण प्राप्त रवी देवकर यांचा सन्मान

shivrajya patra

सोलापूर : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचा स्नेह मेळावा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर पार पडला. या स्नेह मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर आणि राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरीय क्रांतिवीर वड्डे ओबाण्णा समाजभूषण पुरस्काराचे मानकरी रवी देवकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

महासंघाचे सोलापूर जिल्हा सचिव आणि बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे खजिनदार रवी देवकर यांना पुणे येथे तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन यांच्यावतीने राष्ट्रीय स्तरीय क्रांतिवीर वड्डे ओबाण्णा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यानिमित्त महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर आणि राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांच्या हस्ते रवी देवकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी रवी देवकर यांच्या कार्यावर प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे, निर्मला मौळे आदींनी प्रकाश टाकला. तसेच प्रा. अभिजीत भंडारे यांनी देवकर यांच्या कार्याची महती स्वरचित कवितेतून व्यक्त केली. 

प्रारंभी संविधान बचाव समिती सोलापूर यांच्यावतीने 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. 

यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, मोहोळ तालुकाध्यक्ष शिवाजी जगताप, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष नितीन गायकवाड, प्रिया कदम, पृथ्वी शिंदे, रिजवाना बेलीफ, मेहबूब तांबोळी, एकोराम चौगुले, रवींद्र चौगुले, फरीदा बेलीफ, जयदीप गायकवाड, स्वप्नजा कसबे,  इन्नुस बाळगी, नागेश सातपुते, भीमराव माने, संदीप निस्ताने, डॉ. श्रुतिका उडाणशिव, राजेंद्र सोरटे, महानंदा शिंदे, इरफान शेख आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

मेळाव्याचे प्रास्ताविक इन्नुस बाळगी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.युवराज भोसले यांनी केले. सोलापूर जिल्हा महिला विभाग प्रमुख निर्मला मौळे यांनी शेवटी आभार मानले.

To Top