विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबर थोर महापुरुषांच्या कार्याची जाणिव करून द्यावी : डॉ. जन्नत बागवान

shivrajya patra

चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेत बालदिवस उत्साहात साजरा

सोलापूर : हल्लीच्या स्पर्धात्मक युगात शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण पध्दती अन् तंत्रज्ञानाची ओळख करुन देणे काळाची गरज आहे. ते त्यातून कोणत्याही आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याचं धाडस त्यांच्यात निर्माण होईल. त्यांना चांगल्या शिक्षणाबरोबर ऐतिहासिक थोर महापुरुषांच्या कार्याची जाणिव करून द्यावी, असं आवाहन डॉ. जन्नत बागवान यांनी केले.

येथील फिरदोस महिला शिक्षण व समाज सेवा संस्था संचलित चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेत स्वतंत्र भारताचे पहिले प्रथम सेवक स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 14 नोव्हेंबर रोजी 'बाल दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक मो. इक्बाल बागबान होते तर अध्यक्षस्थानी डॉ. जन्नत बागबान होत्या. 

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून हाजी बशीर अहमद बागबान यांची उपस्थिती होती. तसेच त्याच दिवशी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. जन्नत बागबान यांचाही वाढदिवस होता, म्हणून सर्व शिक्षकांतर्फे त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

डॉ. जन्नत बागबान यांनी अध्यक्षीय भाषणात, शिक्षकांना मार्गदर्शन करताना, विद्यार्थ्यांना बालदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्तानं चांगल्या प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केल्याबद्दल सर्वांचं त्यांनी अभिनंदन केले. 

यावेळी शाळेच्यावतीने बालदिवसानिमित्त वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी विद्यार्थ्यांनी समूह गीत, वक्तृत्व स्पर्धा व गांधी परिवारातील सर्व सदस्यांचे पोषाख परिधान करून गांधी परिवाराची ओळख विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बागबान नाहिद सुल्ताना व चौधरी यास्मीन या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाफिया शेख व खतिब उम्मे हबीबा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

To Top