गर्दीत प्रवाशी महिलेचे दागिणे चोरीत मुद्देमालासह तरुणी तर दुचाकी चोरीत 02 चोरटे अटकेत

shivrajya patra

सोलापूर/सोहेल शेख :  एस.टी. स्टॅंड परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलेचे पैसे व सोन्या-चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या मुलीस ताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या D. B. पथकानं अवघ्या 12 तासात गुन्हा उघडकीस आणला. तसंच सोलापुरात सातत्याने मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत दोन आरोपींना अटक करुन उभयतांकडून 03 मोटारसायल हस्तगत करण्यात आल्या. त्यांची सरकारी किंमत  03, 40, 000 रुपये असल्याचं सांगण्यात आलंय.

धाराशिव-सोलापूर बसमध्ये तुळजापुराहून प्रवास करून सोलापूर बस स्थानकात उतरलेल्या श्रीमती जयश्री दत्तात्रय झुंजकर (वय-59 वर्षे, रा. गौडगांव ता. बार्शी) या बेगमपूर इथं जाण्यासाठी सांगोला एसटीत चढल्यावर तिकीट काढत असताना, त्यांच्या पर्समधून रोकड, सोन्या-चांदीचे दागिणे चोरीस गेल्याचा प्रकार लक्षात आला. 

त्यांनी पैसे व सोन्या-चांदीचे दागिण्याचा एस.टी. बस मध्ये शोध घेतला, परंतू ते मिळून आले नाहीत. ही घटना गुरुवारी,13 नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. त्यांनी ही घटना त्यांचा भाऊ अन् मुलास सांगितला. त्यानंतर त्या फौजदार चावळी पोलीस ठाण्यात गेल्या.

त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांनी तक्रारदार महिलेने माहीती देताच त्यांनी संवेदनशिलता व कार्यतत्परता दाखवून त्या महिलेस धीर देऊन त्यांची तक्रार तात्काळ नोंदवून घेतली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यावर वपोनि राऊत यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि क्षिरसागर यांना पथकासोबत सदर गुन्ह्यातील आरोपीचा तात्काळ शोध घेण्यासंबंधी आदेश दिले.

सपोनि संजय क्षिरसागर व त्यांच्या पथकानं तात्काळ त्या आरोपीत महिलेचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेण्याच्या कामाला गती दिली. त्यात  असताना पोलीसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अंदाजे 20 वर्षी तरूणी झोपडपट्टी नंबर-02 सोलापूर येथे राहत असून ती काही वेळाने चोरीचे दागिने विक्री करण्याकरिता पंचकट्टा मार्गे, सराफ कट्टा सोलापूर येथे जाणार आहे." अशी खात्रीशीर माहिती मिळाली. 

त्या महितीचा शहानिशा करुन त्या संशयित तरुणीस अवघ्या बारा तासात ताब्यात घेतले.  तिच्याकडं चौकशी करता, तिनं तिचं नांव शिल्पा वेळू उपाध्ये (वय-19 वर्षे, मूळ रा.बापू नगर, रामपुरे मेडीकल कॉलेज समोर, सेडम रोड.), गुलबर्गा येथील रहिवासी असल्याचं सांगून ती हल्ली सध्या भैरुवस्ती रिक्षा स्टॉप जवळ, शारदा मसुती यांचे घरी भाड्याने राहात असल्याचं सांगीतलं.

तिच्याकडं  महिला पोलीसांनी कसून चौकशी करता, तिनं गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात केले. पोलिसांनी तात्काळ ही माहीती दिल्यावर आलेल्या  महिला प्रवाशी जयश्री झुंजकर यांनी भरल्या नयनांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले.

दुसऱ्या घटनेत उत्तर कसब्यातील रहिवासी रोहन राजेंद्र पांढरे (वय-28 वर्षे) यांच्या घराजवळून चोरीस गेलेल्या मोटार सायकल चोरी गुन्ह्यात फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत आणि पोलीस निरीक्षक दराडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथक तपासात गुंतले होते. 

तपासादरम्यान पोलीसांनी घटनास्थळाच्या आजुबाजुचे व रोडचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तसेच इतर तांत्रीक तपास केला. त्याआधारे तपास करीत असताना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार अंदाजे 20 ते 25 वर्षीय वयोगटातील 02 संशयीत दोन विनानंबर प्लेट KTM व एक युनिकॉर्न मोटार सायकलीसह जुनी मिल कंपाऊंडमधील कडबा मैदानात अंधारात थांबल्याचे समजलं. 

त्यावरुन डी.बी. पथकाचे सपोनि क्षिरसागर, व पथकाने सापळा लावून त्या 02 तरुणांना ताब्यात घेताना उभयतांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्यांना शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्यांची नांवे विशाल विलास राठोड (वय-25 वर्षे, धंदा-बेरोजगार, राहणार- अल्लापूर तांडा, सिंदगी रोड, विजयापूरा) तर दुसऱ्याचे नाव प्रदिप सुभाष राठोड (वय-23 वर्षे, धंदा- खा. नोकरी, राहणार- योगपूर, मुनेश्वर कॉलनी, सिंदगी रोड, विजयापूरा) असे असल्याचे सांगितले. 

त्यांच्याकडं कौशल्यपुर्ण व शिताफीने तपास करुन त्यांचे ताब्यातून त्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या MH-13-ED-5055 या मोटार सायकलसह  03, 40, 000 रुपयांचा मुद्देमाल अशा 03 मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या.

अशाप्रकारे फौजदार चावडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि क्षिरसागर व पथकाने अवघ्या 12 तासात प्रवाशी महिलेचे चोरी गेलेले सोन्या-चांदीचे दागिने परत मिळवून दिले, तसेच 03 मोटार सायकल हस्तगत करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड केले. या उत्कृष्ट कामगिरीमुळं पोलीसांबद्दल त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण होणं स्वाभाविक आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-01) प्रताप पोमण, व.पो.नि. महादेव राऊत, दु.पो.नि. तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोह प्रविण चुंगे, पोना शिवानंद भिमदे, पोकॉ शशिकांत दराडे, पोकॉ विनोद व्हटकर, पोकॉ कृष्णा बडुरे, पोकॉ विनोदकुमार पुजारी, पोकॉ अजय चव्हाण, पोकॉ अमोल खरटमल, पोकॉ ज्ञानेश्वर गायकवाड, पोकॉ तौसिफ शेख, पोकॉ अतिश पाटील, पोकॉ सुरज सोलवनगर, पोकॉ नितीन मोरे, पोकॉ पंकज घाडगे यांनी पार पाडली.

To Top